Saturday, June 29, 2024

‘चिनीकम’ फेम अभिनेत्री स्विनी खाराचा साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार आणि अभिनेत्री स्विनी खराने नुकताच तिच्या मित्रासोबत उर्विश देसाईसोबत साखरपुडा केला आहे. स्विनीने तिच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. स्विनी मनोरंजनविश्वातील ओळखीचा चेहरा आहे. सध्या तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्विनीने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. स्विनीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या गाजलेल्या ‘चिनीकम’ या सिनेमात काम केले होते. सोबतच तिने ‘बा बहू और बेबी’ या मालिकेत देखील काम केले होते. मात्र मागील काही काळापासून ती मनोरंजनविश्वपासून दूर आहे. तिचा लूक देखील मोठ्या प्रमाणावर बदलला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swini Khara (@swinikhara)

स्विनी खरा २०१६ साली आलेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने धोनीच्या बहिणीची जयंतीची भूमिका साकारली होती, मात्र लहानपणाची. तिची ही भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. स्विनी खरा अभिनयात जरी पाहिजे तेवढी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. तिने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मी माझ्या कागदाच्या अंगठीसोबत लग्न करणार आहे.” स्विनी तिच्या साखरपुड्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्यावर डायमंड आणि एमरल्ड नेकलेसने चार चांद लावले. तिच्यासोबतच तिचा मित्र उर्विश देखील काळ्या रंगाच्या सुटमधे खूपच हँडसम दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swini Khara (@swinikhara)

स्विनी खाराने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सैफ अली खान आणि विद्या बालन यांच्या ‘परिणिता’ या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. यासोबतच ती शाहिद कपूर आणि आयेशा टाकिया सोबत ‘पाठशाळा’ या सिनेमात देखील दिसली होती. सोबतच तिने ‘जिंदगी खट्टी-मीठी’, ‘दिल मिल गए’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिच्या या आनंदाच्या प्रसंगी तिला शुभेच्छा देत आशीर्वाद देत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा