Sunday, August 10, 2025
Home टेलिव्हिजन ‘माझ्या डोळ्यातून अश्रू येतात’ होळीच्या निमित्ताने अभिनेत्री छवी मित्तलने शेअर केली भावनिक पोस्ट

‘माझ्या डोळ्यातून अश्रू येतात’ होळीच्या निमित्ताने अभिनेत्री छवी मित्तलने शेअर केली भावनिक पोस्ट

सध्या देशात प्रत्येकावर होळीचा रंग चढलेला आहे. वाईट वृत्तीचा नाश करत सद्गुण स्वीकारण्याची शिकवण होळी आपल्याला देते. सोबतच या सणात खेळले जाणारे रंग देखील आपल्या आयुष्यातील गेलेले, धूसर झालेले रंग पुन्हा भरण्याचे काम करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात या सणाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या चांगल्या वाईट आठवणी असतील. या सणाच्या निमित्ताने आपसूकच त्या आठवणी आपल्या डोक्यात सहज येऊन जातात. याला कलाकार देखील अपवाद नाही. याच होळी सणाशी संबंधित एक आठवण नुकतीच अभिनेत्री छवी मित्तलने शेअर केली आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे छवी मित्तल. ‘तीन बहुरानियां’, ‘तुम्हारी दिशा’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘बंदिनी’, ‘नागिन’, ‘एक चुटकी आसमान’, ‘विरासत’ आदी अनेक मालिका आणि काही चित्रपटांमध्ये काम केलेली छवी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. तिचे स्वतःचे एक यूट्यूब चॅनेल असून, त्यावर ती सतत विविध व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच तिने होळी या सणाची ती एक आठवण इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ही आठवण आहे तब्बल १९ वर्षांपूर्वीची. तिच्या संघर्षाची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

छवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज बरोबर १९ वर्षांपूर्वी २००४ साली होळी होती. हा तोच दिवस होता, जेव्हा माझे नशीब कायमचेच बदलले. मी तेव्हा २४ वर्षांची होती आणि आज १९ वर्षांपूर्वी मी मुंबईत आली होती. एकदम एकटी, कोणाच्याही संपर्काशिवाय, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय फक्त एक माझे स्वप्न माझ्यासोबत होते. आज मी जेव्हा त्या दिवसांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. सोबतच त्या दिवसांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, सांगितल्या.”

पुढे छवी लिहिते, “या होळीच्या प्रसंगी मी तुम्हा सर्वांच्या मंगलमयी होळीसाठी प्रार्थना करते. उतार चढाव, चांगले वाईट, अवघड सोपे, यश अपयश, भांडणं, मेकअप आदी सर्वच गोष्टींमधून आपण गेलो आहोत.मात्र नेहमी आनंदी, आशावादी आणि रंगीन राहा.” तिच्या या पोस्टवर तिचे फॅन्स आणि कलाकार जोरदार कमेंट्स करत तिचे कौतुक करत आहे. मागच्या वर्षी २०२२ साली छवीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मात्र तिने खंबीरपणे त्यावर मात केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी

हे देखील वाचा