Wednesday, July 3, 2024

कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले; फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.कंगना सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या विषयांवर मत मांडत असते. ती बोलली आणि वाद झाला नाही असे फार कमी वेळा झाले आहे. सध्या कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

कंंगणाना तिच्या ‘ तेजस ‘ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर कंगनाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘तेजस’ चित्रपट दाखवला. कंगनाने मुख्यमंत्र्यांसाठी आयोजित ‘तेजस’च्या स्क्रीनिंगमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये मंत्री ‘तेजस’ चित्रपटाचा आनंद लुटताना दिसत आहेत आणि उर्वरित फोटोंमध्ये योगी आदित्यनाथ अभिनेत्रीचा सन्मान करताना दिसत आहेत. या दरम्यान, ‘ तेजस ‘ चित्रपट पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, “आज माननीय मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ आणि सीएम पुष्कर सिंह धामी जी यांच्यासाठी सैनिक किंवा शहीद यांच्या जीवनावर आधारित ‘तेजस’ चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी तेजस ‘ चित्रपट पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.”

कंगनाने पुढे लिहिले की, “तुम्ही पहिल्या फोटोत पाहू शकता की, ‘तेजस’च्या शेवटच्या एकपात्री नाटकात महाराजांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ‘सैनिकाला काय हवे’. महाराज जी, आमचे धैर्य, शौर्य आणि त्याग, सैनिक हे पाहून तो इतका भावूक झाला की त्याचे डोळे भरून आले. धन्यवाद महाराज जी, तुमच्या स्तुतीने आणि आशीर्वादाने आम्ही धन्य झाले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

सर्वेश मेवडा दिग्दर्शित ‘ तेजस ‘ या सिनेमाची रिलीजपूर्वी बरीच चर्चा झाली होती , पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही. कंगनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.25 कोटींची कमाई केली होती. शनिवारा आणि रविवारीही कमाईत वाढ झाली नव्हती. उलट सोमवारी संकलन 40 लाखांवर घसरले. आतापर्यंत या चित्रपटाने केवळ 4.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. (Chief Minister Yogi Adityanath cried profusely after seeing To scene in Kangana Tejas)

आधिक वाचा-
‘गाफील’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ कलाकाराची होणार जबरदस्त एंट्री
एकच नंबर! वैभव तत्तवादीचा ‘माहिये जिन्ना सोना…’ गाण्यावरील डान्स चर्चेत, पाहा भन्नाट व्हिडीओ

हे देखील वाचा