Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

एक्सप्रेशन क्वीन असलेल्या छोट्या ‘परी’चा ‘तेरी मेरी गल्ला होगी मशहूर’ गाण्यावरचा व्हिडिओ व्हायरल

मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत. ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण या वर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात. ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ.

मायरा ही मालिकेत येण्या आधीपासूनच खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तसेच यूट्यूबवर देखील तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती ‘शेरशाह’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘राता लंबिया’ वर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिचे हावभाव खूप सुंदर दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर फ्रॉक घातला आहे. तसेच केसांना हेअर बेल्ट लावला आहे. तसेच पायात सुंदर गुलाबी रंगाचे शूज घातले आहेत. (Child actress myra vaikul’s dance video viral on social media)

तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. प्रार्थना बेहेरे हिने या फोटोवर “किती गोड” अशी कमेंट केली आहे. तसेच मायराचे चाहते देखील या व्हिडिओवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.

मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत असून, मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा