Saturday, July 6, 2024

‘माझ्या दिलाचो पावशेर किलोचो’ गाण्यावर छोट्या मायराने धरला ठेका; तुम्हालाही आवडेल चिमुकलीचा गोंडस अंदाज

मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत. ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, या वर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात. ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ होय. मायरा देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मायराच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणारे गाणे ‘माझ्या दिलाचो पावशेर किलोचो’ वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मायरा नेहमीप्रमाणेच खूप क्यूट दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा खण टॉप आणि जांभळ्या रंगाचा खण स्कर्ट घातला आहे. तसेच गळ्यात ऑक्साईड ठुशी घातली आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप छान हावभाव करताना दिसत आहे. (Child actress myra vaikul’s dance video viral on social media)

तिच्या या गोड व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मायरा ही सर्वांची लाडकी बालकलाकार आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते जोरदार प्रतिसाद देत असतात.

मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत आहेत. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते. ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिंकूने आपल्या कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर; तुम्हालाही आवडेल अभिनेत्रीचं ‘प्राणीप्रेम’

-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

-‘सफर खूबसूरत है, मंजिल से भी…’, म्हणत पाठक बाईंनी साडीमध्ये दाखवला दिलकश अंदाज

हे देखील वाचा