मंडळी दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणून ‘बाल दिवस’ भारतात साजरा केला जातो. पण केवळ भारतातमध्येच बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. यापुर्वी भारतामध्ये बालदिन 20 नोव्हेंबरला साजरा केला जात होता. आज आपण बालदिनानिमित्त मराठी मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून उत्तम अभिनय सादर करणाऱ्या कलाकारांविषयी जाणून घेऊया…
सध्या मराठी मालिकांमध्ये मुख्य कालाकारांपेक्षा बाल कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. हे बालकलाकार साेशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांमध्ये चांगलीच लाेकप्रियता मिळवत आहे. यामध्ये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (mazi tuzi reshimgathi) मालिकेतील मायरा वैकुळ (Myra Vaikul)म्हणजेच परीहिने आपल्या अभिनयाने आणि चंचल स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
View this post on Instagram
झी मराठीवरील लाेकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) यामध्ये चिंगीचे पात्र सारारणारी साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने साेज्वळ लूकने आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करत आहे. यापुर्वी साईशा ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेत दिसली हाेती.
View this post on Instagram
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta)या दमदार मालिकेत जयदीप-गौरीच्या मुलीची भूमिका साकारणारी लक्ष्मी म्हणजे साईशा साळवी (Saisha Salvi) चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
View this post on Instagram
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अथर्व हे पात्र साकारणारा आर्यन देवगिरी आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या दिलावर राज्य करत आहे. (Children day special famous child actors in marathi serials)
हेही वाचा-
–शेहनाझ गिलने घेतले बद्रीनाथचे दर्शन, सोशल मीडियावरील फोटोंनी वेधले लक्ष
–भारीच ना! दीपिका – रणवीरच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण, ‘अशी’ हाेती पहिली भेट