Monday, July 8, 2024

Children’s Day 2022: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, ‘ही’ फिल्मी गाणी ऐकत बनवा तुमचा बालदिन खास

दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. मुलांवर खूप प्रेम करणाऱ्या चाचा नेहरूंनी, आपला वाढदिवस मुलांच्या नावाला समर्पित केला, हे सर्वांनाच माहीत आहे. या खास प्रसंगी बॉलिवूडच्या गाण्यांची चर्चा होणार नाही, असे कसे होऊ शकते? बॉलिवूडमध्ये लहान मुलांवर खूप कमी चित्रपट बनले असले, तरी जे बनले आहेत ते अतिशय उत्कृष्ट आणि संदेश देणारे आहेत.

जसे की, आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ चित्रपट. या चित्रपटात असे सांगण्यात आले आहे की, सहसा पालक किंवा शिक्षक मुलांच्या समस्या समजू शकत नाहीत. तसेच आता आपण बालदिनाच्या उत्सवाबद्दल बोलत आहोत. तर या खास प्रसंगी कोणत्या चित्रपटातील गाण्यांचा आस्वाद घेता येईल हे पाहुयात… (childrens day enjoy with taare zameen par to masoom all time favourite bollywood songs)

चाचा नेहरूंना लहान मुलांची खूप आवड होती. या दिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशामध्ये बॉलिवूडची अनेक गाणी आहेत ज्याशिवाय बालदिन अपूर्ण वाटतो. सर्वप्रथम येते 1962 मध्ये आलेल्या ‘सन ऑफ इंडिया’ चित्रपटातील ‘नन्हा मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं’ हे गाणे. मेहबूब खान दिग्दर्शित हे गाणे आज इतकी वर्षे उलटूनही प्रत्येक बालदिनी उत्साहाने वाजवले जाते.

आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘बम बम बोले मस्ती में डोले’ हे प्रसिद्ध गाणे आहे. बालदिनानिमित्त या गाण्याच्या आनंदात तुमच्या मुलांसह स्वतःलाही मग्न करा. या गाण्यात मुलांसोबत खेळ खेळताना आमिर त्यांना जगाची शिकवण देताना दिसतो.

आता येते ‘मासूम’ चित्रपटातील गाणे. ‘छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे…’ या गाण्यात लहान मुलांचा शो उत्तम पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. 1997 मध्ये आलेल्या ‘मासूम’ चित्रपटातील हे गाणे आदित्य नारायणने बालगायक म्हणून गायले होते. आदित्यचा आवाज आणि बोल यामुळे हे गाणे सर्वात लोकप्रिय बालगीतांपैकी एक बनले आहे.

आमिर खान आणि काजोल यांच्या सुपरहिट चित्रपट ‘फना’ मधले ‘चंदा चमके छम छम, चीखे चोकन्ना चोर’ हे गाणे ऐकून तुम्ही तुमचा आणि तुमच्या मुलांचा हा दिवस आणखी खास बनवू शकता.

 

सत्येन बोस दिग्दर्शित 1996) मध्ये आलेल्या ‘मासूम’ चित्रपटातील ‘लकडी की काठी, काठी का घोडा’ या गाण्याशिवाय बालदिन पूर्ण होत नाही.

हेही वाचा :
आहा कडकच ना! मुख्य कालाकारांपेक्षा ‘हे’ बालकलाकार आपल्या अभिनयाने वेधतात प्रेक्षकांचे लक्ष
भारीच ना! दीपिका – रणवीरच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण, ‘अशी’ हाेती पहिली भेट

हेही पाहा-

हे देखील वाचा