Tuesday, June 24, 2025
Home मराठी लाखो फॉलोवर्स, करोडो लाईक्स! सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ जुळ्या बहीणी आहेत तरी कोण?

लाखो फॉलोवर्स, करोडो लाईक्स! सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ जुळ्या बहीणी आहेत तरी कोण?

मंडळी आपल्या आयुष्यात कधी जुळ्या व्यक्ती आल्या आहेत का? नसतील आल्या तर आपण वाचलात परंतु जर आल्या असतील तर त्यांना ठाऊक असेल की आशा व्यक्तींसोबत नात असणं म्हणजे डोक्याला किती ताप असतो ते… नाही त्या अर्थाने नाही परंतु तारांबळ उडते अहो सगळीच. आधी तर त्यातील योग्य व्यक्ती शोधणं कठीण असतं. कारण दोघेही सारखेच दिसतात. त्यात जर आवाजही सारखाच असला तर मग विषयच संपला. दुरूनच नमस्कार करून आपण आपल्या रस्त्याला लागलेलं बरं. पण अशा जुळ्या भावंडांना आपण अनेकदा टीव्हीवर रिऍलिटी शोजमध्ये पाहिलं आहे.

अशाच दोन जुळ्या बहिणी कपिल शर्माच्या शो मध्ये आल्या होत्या आठवतंय का? जर हो तर मग थोडं मेंदूला आणखी ताण द्या आणि नावं आठवतायत का पहा दोघींची? नाही, हरकत नाही आम्ही सांगतो. चिंकी-मिंकी! आता आठवल्या असतील. कपिलला अक्षरशः घाम फुटला होता यांच्याशी बोलताना… याच दोघी बहिणींनी त्यांचे काही बोल्ड फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत चला तर मग पाहुयात.

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मधे आपल्याला चिंकी आणि मिंकी या नावाने माहीत असलेल्या जुळ्या बहिणी सुरभी आणि समृध्दी यांनी काही बोल्ड फोटोज त्यांच्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. या दोघींच्या चाहत्यांची संख्या सोशल माध्यमांवर इतकी आहे की हे फोटोज क्षणार्धात  व्हायरल होत आहेत.

चिंकी आणि मिंकी त्यांच्या मजेदार शैलीसाठी ओळखल्या जातात. या दोघी बहिणी दिसायला अगदी एकसारख्या तर आहेतच, परंतु त्यांची बोलण्याची शैली देखील अगदी एकसारखी आहे. त्यामुळे त्यांना समोर पाहणाऱ्यांची नेहमीच तारांबळ उडते.

गंमत म्हणजे बर्‍याच वेळा लोक फसतात की नेमकी चिंकी कोण आहे आणि मिंकी कोण… कपिल शर्माच्या शोमध्ये जबरदस्त प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता या बहिणींची फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली आहे.

चिंकी आणि मिंकी सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहेत आणि तिथे त्या त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. इंस्टाग्रामवर ५३ लाखांहून अधिक लोक चिंकी आणि मिंकीला फॉलो करतात आणि म्हणूनच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात.

चिंकी आणि मिंकी इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात, जे पाहून त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाची काय अवस्था होत असेल याचा आपण विचार तर करूच शकता.

आता या जुळ्या बहिणी कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. दोघींनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. गेल्या काही वर्षांत या दोन बहिणींची शैलीही बरीच बदलली आहे. दोघीही या ना त्या टीव्ही कार्यक्रमात झळकतच असतात.

हे देखील वाचा