मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर हा आपल्या दमदार अभिनयासाठी आणि लिखाणासाठी ओळखला जातो. चिन्मय सध्या ‘आलंय माझ्या राशीला’ असं म्हणतोय. नेमकं त्याच्या राशीला काय आलंय? असा प्रश्न तुम्हालााही पडलाच असेल. की एवढा दमदार अभिनेत आलंय माझ्या राशीला असं का म्हणतोय. तर दुसरं तिसरं काही नसू अभिनेता आपला एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने मराठी इंडस्ट्रीमधील अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केलं आहे. ‘आलंय माझ्या राशीला’ (Aalay Mazya Rashila) धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर नुकतांट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
काळ जरी पुढे गेला असला तरी काही व्यक्ती असतात जी अजूनही आपल्या राशी भविष्यावर विश्वास ठेवत असतात. प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्ये, सौंदर्य आहेत. या वैशिष्ट्यांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे तर चित्रपटाची निर्मिती ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर यांनी केली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये चिन्मय मांडेलेकरसोबत अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal), मोहन जोशी (Mohan Joshi) निर्मिती सावंत, प्रसाद ओक (Prasad Oak), अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड यांच्या या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. युवा अभिनेता प्रणव पिंपळकर हा चित्रपटाद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आलंय माझ्या राशीला या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं असून सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. आलंय माझ्या राशीला हा चित्रपट (दि, 10 जानेवारी ) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पतली कमरिया…’म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी साडीमध्ये लगावले जोरदार ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल
‘तेनु काला चश्मा जचदा ऐ…’, साेनालीचा क्लासी अंजाद!