Thursday, June 12, 2025
Home मराठी ‘देवा गणराया’ बाप्पाचे नवीन गेले झाले प्रदर्शित, ‘हे’ कलाकार दिसतायेत मुख्य भूमिकेत

‘देवा गणराया’ बाप्पाचे नवीन गेले झाले प्रदर्शित, ‘हे’ कलाकार दिसतायेत मुख्य भूमिकेत

बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. सगळ्यांच्या घरी गणरायाच्या आगमनाची तयारी चालू आहे. बाप्पाची अनेक नवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशाच ‘देवा गणराया’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. पोस्टरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अशातच हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री रुपाली भोसले यांच्यावर चित्रित झाले आहे.

चिन्मयने या गाण्याचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिन्मय आणि रुपाली पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. हा पोस्टर शेअर करून त्याने लिहिले आहे की, “देवा गणराया, गणपती बाप्पा मोरया म्हणत आमचे पहिले गाणे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करीत आहोत. या गणेशोत्सवात देवा गणराया करणार वातावरण मंगलमय.” (chinmay udgirkar and rupali bhosale’s deva ganraya new song release)

‘देवा गणराया’ हे गाणे संदीप माळवी यांनी लिहिले आहे. चिनार-महेश यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर स्वप्नील बांदोडकरने त्याच्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे. गाण्याचे निर्माते केदार जोशी हे आहेत. तर आशिष नेवाळकर हे या गाण्याचे दिग्दर्शक आहेत.

‘देवा गणराया’ या गाण्यात एक कहाणी दाखवली आहे. नवीन लग्न झालेलं जोडपं गणरायाच्या दर्शनाने त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतात, हे या गीतातून दाखवले आहे. या गाण्यात चिन्मय आणि रुपाली हे दोघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

रुपाली आणि चिन्मय हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. रुपाली सध्या स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे तर चिन्मय ‘अगंबाई सुनबाई’ या मालिकेत काम करत होता. नुकतेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा