सज्ज व्हा मंडळी! बहुप्रतिक्षीत ‘आचार्य’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, पहिल्यांदाच दिसणार सुपरहिट बाप-लेकाची जोडी


नवीन वर्ष सुरु झाले तसा कोरोनाचा कहर कमी झाला आहे, आणि त्यात आता लास देखील बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मनोरंजनसृष्टीमध्ये देखील चित्रपटांचे शूटिंग सुरु झाले आहे, तर काही सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे  जे लॉकडाऊ लागले होते त्यामुळे अनेक चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. मात्र आता एकामागोमाग एक अनेक सिनेमे प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी येणार आहे.

नुकताच ‘मास्टर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळत या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड नोंदवले आहेत. आता मागच्या काही दिवसांमध्ये अनेक सिनेमांचे टिझर आणि प्रदर्शनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यातच अजून एक सिनेमाची भर पडली आहे, हा सिनेमा आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांचा आगामी ‘आचार्य’ सिनेमा. नुकताच या सिनेमाचं टिझर प्रदर्शित झाला आहे.

या वर्षातला हा सर्वात प्रतिक्षीत सिनेमांमधील एक सिनेमा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन सुपरस्टार एकाच सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात चिरंजीवी आणि रामचरण ही साऊथची हिट बापलेकाची जोडी दिसणार आहे. अजून या सिनेमाचे वैशिट्य म्हणजे रामचरण या सिनेमातून निर्माता म्हणून पदार्पण करत आहे.

हा सिनेमा ह्यावर्षी उन्हाळ्यात १३ मे ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर पाहून हा सिनेमा धार्मिक विषयावर आधारित असल्याचे दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये रामचरणचे नॅरेशन ऐकू येते. त्यात तो म्हणतो, अन्यायापासून वाचवण्यासाठी नेहमी देवच येणार हे आवश्यक नाही, काही वेळेस आपल्याला एका कॉम्रेडची गरज असते.”

ह्या सिनेमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याचा मुलगा रामचरण ही वडील, मुलाची जोडी एकाच सिनेमात दिसणार आहे. या योगायोगाबद्दल रामचरण सांगतो, ” मला माझ्या वडिलांसोबत काम करायला मिळाले हा मी माझ्यासाठी मोठा सन्मान समजतो. हा चित्रपट माझ्यासाठी फक्त सिनेमा नसून  त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक आहे. मी अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभवासाठी चित्रपटाचे निर्माते आणि पूर्ण टिमचे आभार मानतो.”

‘आचार्य’ चित्रपटात हे बाप लेक नक्की कोणती भूमिका साकारणार आहेत याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या बाप-लेकाच्या जोडीला मोठ्या पडद्यावर सोबत पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

 

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.