Monday, October 2, 2023

मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय जोडीला कोर्टाचा दणका, ब्लड बँक केसमध्ये एक वर्षाचा तुरुंगवास

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चिरंजीवी ब्लड बँकेशी संबंधित मानहानी प्रकरणात लोकप्रिय तेलगू अभिनेता राजशेखर आणि त्याची पत्नी जीविता यांना नामपल्ली कोर्टाने एका वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील या जोडीला नामपल्लीच्या १७व्या एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट यांनी एक वर्षाची जेल आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान मागील मोठ्या काळापासून या निकालाची सर्वांना प्रतीक्षा होती. जो आता लागला आहे. मात्र या जोडीने जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांना जामीन मिळाला आहे. आता त्यांच्याकडे हायकोर्टात या निकालाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. तत्पूर्वी चिरंजीवी ब्लड बँकच्या माध्यमातून अनेक गरजवंताना मदत केली जाते. २०११ साली दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अभिनेते जीवत आणि राजशेखर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मेगास्टार चिरंजीवी द्वारा चालवल्या जाणाऱ्या ब्लड बँकेवर सणसनीखेच आरोप लावले होते. त्यांनी सांगितले होते की, ब्लड बँकेच्या माध्यमातून जमा केलेले ब्लड मार्केटमध्ये विकले जात असल्याचे सांगितले.

या जोडीच्या याच आरोपावर फिल्म निर्माता असलेल्या अल्लू अरविंद यांनी केस दाखल केली. मोठ्या काळानंतर कोर्टाने शेवटी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. दंड भरणाऱ्या दोन लोकांनी बॉन्ड जमा केल्यानंतर त्या दोघांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे.

हे देखील वाचा