Wednesday, July 3, 2024

प्रेक्षकांचे मनोरंजन करायला नवा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सज्ज, पार पडला ‘चित्र मराठी’चा नाव अन् लोगो अनावरण सोहळा

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप जास्त महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सगळे चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे सध्या प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे झुकताना दिसत आहे. या दिवसात दर्शकांनी अनेक चित्रपट तसेच वेबसिरीज ओटीटीवर पाहिले आहेत. अशातच आणखी एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. ‘चित्र मराठी… मनोरंजन घराघरात, मनोरंजन मनामनात’ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दणक्यात प्रवेश केला आहे. यावर चित्रपट, शॉर्ट्स फिल्म्स, मनोरंजन, राजकारण, अध्यात्म असा कंटेंट दाखवला जाणार आहे. सुरुवातीलालच या प्लॅटफॉर्मवर तब्बल दहा वेबसिरीज प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

मंदार काणे एंटरटेनमेंट आणि स्पार्कल्स ९ मीडिया निर्मित ‘चित्र मराठी’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्ममची घोषणा केली आहे. नुकतेच याचे नाव आणि लोगो अनावर सोहळा पार पडला आहे. यावेळी या समारंभात दिग्दर्शक राज दत्त आणि अभिनेते जयंत सावरकर यांनी हजेरी लावून ‘चित्र मराठी’ प्लॅटफॉर्मचे संस्थापक मंदार काणे आणि सह संस्थापक समीर पौलस्ते यांच्यासोबत चित्र मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण केले. (chita marathi new marathi ott platform launched)

यावेळी ‘चित्र मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख, संस्थापक मंदार काणे म्हणाले की, “लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टी पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे नवकलाकारांना उभे राहण्याची संधी कुठेतरी धूसर झाली. याच नवकलाकार आणि प्रतिभावान कलाकारांना उभारी देण्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही येत आहोत. याशिवाय खेड्यापाड्यातील प्रतिभावान मुलांना पुढे आणण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म कधीही कमी पडणार नाही. एका वेगळ्या उंचीवर हा ओटीटी प्लॅटफॉर्म पोहोचवणे हा एकच उद्द्येश्य मनाशी ठेवून हा टप्पा पार करायचा आहे. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आणि आशयघन विषय देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत. लवकरच नवनवीन कंटेंट घेऊन तुमच्या भेटीला येऊ.”

त्यामुळे आता प्रेक्षक हा ओटीटी प्लॅटफॉर्म हाताळायला उत्सुक झाले आहेत. यावर अगदी नवीन कलाकारांना घेऊन काम केले जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग

-‘काश माझी मुलं त्यांना भेटू शकली असती…’ वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश झाला भावुक; मुलांसोबत वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा