Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड सरोज खान यांच्या नकारामुळे चमकले फराह खानचे नशीब, बॉलिवूडमध्ये ‘अशी’ घडली कारकिर्द

सरोज खान यांच्या नकारामुळे चमकले फराह खानचे नशीब, बॉलिवूडमध्ये ‘अशी’ घडली कारकिर्द

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा जुन्या आठवणी शेअर करत असते. फराह आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. पण इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. तरुण वयात तिने कुटुंबासाठी मोठी भूमिका बजावली. वडिलांच्या निधनानंतर घराच्या जबाबदाऱ्या फराहवर आल्या, त्यामुळे तिने हार न मानता त्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या. तिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण फराह साेमवारी (9 जानेवारी ) तिचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे.

स्ट्रेट फॉरवर्ड फराह खान
फराहचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. तिने आजपर्यंत अनेक स्टार्सची कारकीर्द घडवली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, फराहने तिचे करिअर घडवण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत. फराह तिच्या टॅलेंटसाठी तसेच तिच्या निर्दोष वृत्तीसाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. जेव्हा ती टीव्हीवर एखाद्या कार्यक्रमात पोहोचते तेव्हा ते चांगले असो वा वाईट, सरळ बोलण्यास मागेपुढे पाहत नाही.


आयुष्य श्रीमंतीतून गरीब
 होताना पाहिले
फराहचे वडील कामरान हे बी-ग्रेड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. तिच्या वडिलांनी ए-ग्रेड चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला होता. ज्याचे नाव ‘ऐसा भी होता है’ होते. हा चित्रपट फ्लॉप झाला, त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब कर्जबाजारी झाले. फराहने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात श्रीमंतीतून गरिबीकडे येण्याची आणि नंतर पुन्हा रुळावर येण्याची कहाणी सांगितली. “सुरुवातीची पाच वर्षे माझे बालपण खूप चांगले गेले, माझे वडील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. पण बी-ग्रेड चित्रपटांसाठी, ए-ग्रेड चित्रपटांसाठी नाही. त्यांनी ए-ग्रेड चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो फ्लॉप झाल्याने आम्ही एका रात्रीत गरीब झालो. त्यानंतर आम्ही सुमारे 15 वर्षे संघर्ष केला,” असे तिने सांगितले होते.

सरोज खान यांच्या नकारामुळे उजळले फराह खानचे नशीब
माध्यमांतील वृत्तानुसार, फराहच्या वडिलांना दारू पिण्याची वाईट सवय होती, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर फराहने घरची जबाबदारी घेतली. तिचे भविष्य घडवण्यात ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांचा मोठा वाटा आहे. असे म्हटले जाते की, सरोज खान यांना 1992 च्या बॉलिवूड चित्रपट ‘जो जीता वही सिकंदा’ मधील गाण्यांची कोरिओग्राफी करण्यास सांगितले जात होते. परंतु त्या या चित्रपटासाठी तारीख देऊ शकल्या नाहीत आणि शेवटी सरोज खान यांनी निर्मात्यांना चित्रपटासाठी नाही सांगितले.

‘असे’ चमकले नशीब
सरोज खान यांच्या नशिबात फराह खानचे नशीब चमकले. चित्रपटातील गाणी फराहने कोरिओग्राफ केली होती, जी सुपरहिट ठरली. यानंतर फराहचे नशिब असे चमकले की, तिने मागे वळून पाहिलेच नाही.(choreographer farah khan birthday day spl saroj khan made farah khan career know how she became top choreographer of bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माेठा खुलासा! बिग बाॅसच्या घरात शालीन अन् टीना करत हाेते बाळाचे प्लॅनिंग

केआरकेची बॉलिवूड चित्रपटांसाठी अनोखा नियम बनवण्याचे मागणी; म्हणाला, ’80 टक्के नफा सरकारकडे…’

हे देखील वाचा