Tuesday, December 3, 2024
Home हॉलीवूड Oscar 2022 | ‘चापट प्रकरणा’नंतर ख्रिस रॉकच्या आईने व्यक्त केलं दुःख; म्हणाली, ‘त्याने मलाही…’

Oscar 2022 | ‘चापट प्रकरणा’नंतर ख्रिस रॉकच्या आईने व्यक्त केलं दुःख; म्हणाली, ‘त्याने मलाही…’

ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथच्या (Will Smith) पत्नीच्या टक्कलपणाची खिल्ली उडवल्याबद्दल, विलने कॉमेडियन ख्रिस रॉकला (Chris Rock) चापट मारली होती. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. विल स्मिथला ऑस्कर आणि इतर अकादमी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास १० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आता एका महिन्यानंतर, मुलगा ख्रिसला चापट मारल्यानंतर आई रोझ रॉकचे वक्तव्य समोर आले आहे.

लेखक आणि प्रेरक वक्ता रोझ रॉक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ख्रिस आता बरा आहे आणि चांगली कामगिरी करत आहे. त्यादिवशीच्या घटनेतून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.” विलने चापट मारण्यावर, रोझ म्हणाली की, “विलने केवळ ख्रिसलाच नाही, तर आम्हा सर्वांना चापट मारली आहे. जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला चापट मारता, याचा अर्थ तुम्ही मला चापट मारली आहे.” (chris rock mom rose rock reacts to will smith slap in oscars 2022)

रोझ रॉक पुढे म्हणाली की, “मला वाईट वाटते की, त्याने कधीही माफी मागितली नाही. त्याच्या बाजूने फक्त एकच विधान आले की मला ख्रिस रॉकने माफी द्यावी. परंतु त्याने वैयक्तिक काहीही केले नाही.”

‘हे’ होते पूर्ण प्रकरण
ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकने जेडाच्या टक्कल पडल्याची खिल्ली उडवली, त्यानंतर विल रागावला आणि ख्रिसला स्टेजवर जाऊन चापट मारली. यानंतर विल परत आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला आणि ख्रिसला शिवीगाळ करत म्हणाला की, “माझ्या पत्नीचे नाव तुझ्या तोंडात घेऊ नकोस.” खरं तर, जेडा अ‍ॅलोपेशिया या आजाराने त्रस्त आहे, ज्यामध्‍ये डोक्‍याच्‍या वेगवेगळ्या भागातून केस निघून जातात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा