वरुण धवनच्या ‘बेबी जॉन‘ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते, पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 12.5 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत हे कमाईचे आकडे निराशाजनक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बेबी जॉन’चे बजेट जवळपास 180 कोटी रुपये आहे.
चित्रपटाच्या कमाईने वरुण धवनच्या चाहत्यांची निराशा तर केलीच पण इतर मोठ्या चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट मागे पडला. तर ‘बेबी जॉन’ने ‘मुफासा: द लायन किंग’ आणि ‘पुष्पा 2’ पेक्षा कमी कलेक्शन केले. त्याचबरोबर हा मूळ चित्रपट तामिळ चित्रपट ‘थेरी’लाही मागे टाकू शकला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘थेरी’ने फक्त तमिळ व्हर्जनमध्ये 13.1 कोटी रुपये कमवले होते. ऍटली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.‘बेबी जॉन’च्या निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून असे दिसून येते की, ज्यांचे हिंदी डब इंटरनेटवर उपलब्ध आहेत ते चित्रपट पाहण्यात प्रेक्षक उत्सुक नाहीत.
पहिल्या दिवसाच्या कलेक्शननंतर हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये चांगले कलेक्शन करू शकेल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपटाचे बजेट जास्त असल्याने त्यावर आता संकटाचे ढग दाटून आले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सलीम-जावेदना असा मिळाला होता लिखाणाचा पहिला ब्रेक; या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातामुळे…