Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड चक नॉरिस कोण होते? यांनी घडवला अक्षय कुमार यांच्या आतला मार्शल आर्टिस्ट, तर आता यांच्या निधनामुळे अक्षय कुमार भावुक

चक नॉरिस कोण होते? यांनी घडवला अक्षय कुमार यांच्या आतला मार्शल आर्टिस्ट, तर आता यांच्या निधनामुळे अक्षय कुमार भावुक

चक नॉरिस हे एक हॉलिवूड स्टार होते. आणि ते एक अमेरिकन अभिनेते-विनोदी कलाकार होते तसेच त्यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. तर यांच्या जाण्याने अक्षय कुमारने दुःख व्यक्त करत. एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.  चक हे सुपरस्टार हॉलीवुड मधील अत्यंत गाजलेला स्टार आहे. तर अक्षय कुमारने (Kumar) त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की माझ्या व्यक्तिमत्वाला आकार दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच तो पुढे म्हणतो की, “एक मार्शल आर्टिस्ट म्हणून मोठे होत असताना, त्यांची उपस्थिती, शैली नेहमीच माझ्यासोबत राहिली आहे. तसेच त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला.

1940 मध्ये चक नॉरिस हे अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे जन्मले होते. तर त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर लगेचच हवाई दलात दाखल झाले. आणि जेव्हा त्यांची दक्षिण कोरियामध्ये नियुक्ती झाली होती, तेव्हा नॉरिस यांनी मार्शल आर्ट्स शिकले.तर ते शिस्त, शक्ती आणि सहज वाटणारी अवघड कृती करायचे. अनेक कलांमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. 1972 मध्ये, नॉरिसला एका चित्रपटात भूमिका मिळाली आणि त्याने त्यात उत्कृष्ट कामगिरी केली. आणि नंतर त्यानी कॉमेडीनीने, अभिनयाने सर्वाचे मन जिंकले.

चक नॉरिस हे सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते. ज्याने हजारो मीम्सना प्रेरणा दिली आहे. ज्याप्रमाणे रजनीकांतचे पात्र इंटरनेटवर असंख्य विनोदांचा विषय आहे, त्याचप्रमाणे चक नॉरिस अमेरिकेतील मीम विश्वाचा राजा आहे. नॉरिस त्याच्या हास्यकारक कॉमेडीसाठीही ओळखला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

स्वतःच्या आवाजावर नाराज असलेली ही अभिनेत्री ठरली स्टार, करण जोहरने दिला करिअरला टर्निंग पॉइंट

हे देखील वाचा