Friday, July 5, 2024

‘खतरनाक…’, बिकिनीमधील अनन्याची घायाळ करणारी अदा पाहून, उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

कोरोनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीव हे पर्यटन स्थळ निवडले. त्यामुळे सध्या अनेक कलाकारांनी मालदीवला आपला सुट्ट्यांचा अड्डाच बनवला आहे, असे म्हणायला हरकत नाही. रोजच्या कामांमधून विश्रांतीसाठी आणि आयुष्यातील सुखाचे क्षण जगण्यासाठी अनेक कलाकार मालदीवला हजेरी लावत आहेत. अशात अभिनेत्री अनन्या पांडे देखील मालदीवला पोहचली आहे.

अनन्या पांडे आपल्या अभिनयाने कायमच प्रकाश झोतामध्ये असते. तसेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्या चाहत्यांना शेअर करणे तिला खूप आवडते. अनन्या ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. वडिलांप्रमाणेच तिनेही अभिनयातील वारसा पुढे सुरू ठेवला आहे. सध्या ती मालदीवला आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. (Chunky Pandey daughter Ananya Pandey flaunts bold look in black bikini shares glamorous style from Maldives)

अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काळ्या रंगातील बिकिनीवरचा एक हॉट फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजीचा वर्षाव केल्याचे दिसत आहे. तसेच ती या फोटोमध्ये एका हॉटेलवरील रूमवर असल्याचे दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हॉट मेस.” तिच्या या फोटोवर फक्त चाहतेच नाही, तर कलाकार देखील कमेंट करत आहेत. अनन्याच्या या फोटोवर कनिका कपूर, महीप कपूर, नीलम कोठारी, सीमा खान आणि अलाना पांडे यांच्या सह अन्य कलाकारांनी देखील तिचे कौतुक केले आहे. अभिनेत्रीने हा फोटो पोस्ट करत ती मालदीवमध्ये असल्याचे सांगितले आहे. तसेच मालदीवमधील अनेक ठिकाणांवरचे फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीला ठेवले आहेत.

तिच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास ती ईशान खट्टरसह ‘खाली पीली’ या चित्रपटामध्ये झळकली होती. तसेच लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या, विजय देवरकोंडासह ‘लायगर’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच शकुन बत्रा यांच्या एका आगामी चित्रपटामध्ये देखील अभिनय करणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा