Saturday, July 6, 2024

काय सांगता! खऱ्या आयुष्यात देखील शिवाजी साटम यांना बनावे लागले होते ‘सीआयडी’, वाचा त्यांचा प्रवास

‘दया कुछ तो गडबड हैं’ हा डायलॉग ऐकला की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नावं येत, ते म्हणजे ‘सीआयडी.’ यायलाच पाहिजे कारण यामधील एसीपीच्या पात्राने आज सगळ्यांच्या मनात घर बनवले आहे. अगदी बरोबर ओळखलंत! आपण बोलत आहोत, सीआयडी फेम अभिनेता शिवाजी साटम यांच्याबद्दल. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘वास्तव’, ‘सूर्यवंशम’, ‘नायक’ यांसारख्या जवळपास 35 चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. शिवाजी साटम हे त्यांच्या हिंदी चित्रपटांमध्ये जास्त करून पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांच्या खूप कमी चाहत्यांना ही गोष्ट माहित असेल की, शिवाजी साटम यांनी इंग्लिश चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आज याच दिग्गज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 एप्रिल, 1950 मध्ये झाला होता.

पाहायला गेलं तर शिवाजी साटम यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख त्यांच्या सीआयडी मालिकेतील ‘एसपी प्रद्युमन’ या भूमिकेने मिळाली. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

वृत्तानुसार, सीआयडीमध्ये काम करण्याच्या आधी शिवाजी साटम यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती की, ते स्वत: सीआयडी झाले होते. चित्रपटात येण्याआधी ते बॅकग्राउंडला काम करत होते. त्यावेळी एका घटनेसाठी त्यांना पोलिसांना मदत करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी या गोष्टीची कोणालाच कल्पना नव्हती की, एक दिवस हा मुलगा टेलिव्हिजनवर हेच पात्र निभावून लोकप्रिय होणार आहे.

शिवाजी साटम यांनी 1980 मध्ये ‘रिश्ते नाते’ या लोकप्रिय नाटकातून त्यांच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘एक शून्य शून्य’ या मराठी मालिकेमध्ये काम केले. त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. अनेक चित्रपटात काम केल्यानंतर त्यांना सीआयडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेनंतर त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती. सीआयडी ही मालिका टेलिव्हिजनवर जास्त काळ चालणारी पहिली मालिका होती. या मालिकेचा पहिला एपिसोड 21 जानेवारी, 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. 27ऑक्टोबर, 2018 ला या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला होता. म्हणजेच 28 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.(cid fame actor shivaji satam play a cid role in his personal life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एसीपी प्रद्युम्नचे ‘रामायण’शी खास नाते, अशाप्रकारे ‘राजा दशरथ’ने बदलले शिवाजी साटमचे आयुष्य
HAPPY BIRTHDAY : ताहीर राज भसीन कसा बनला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता? जाणून घ्या त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा