‘सीआयडी’ (CID) चं दुसरं सीझन सध्या धमाल चाललंय! नवीन कलाकारही दिसतायत, मजा येतेय पाहायला पण एक जुना कॅरेक्टर आहे ना विवेक (Vivek Mashru) तो आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे. लोक म्हणतात,”विवेक असता तर आणखी मजा आली असती!”
‘सीआयडी’ चा पहिला भाग 1998 मध्ये दाखवला गेला होता. पण 2018 मध्ये शो बंद झाला. आता तब्बल 6 वर्षांनी, 2024 मध्ये ‘सीआयडी’ सीझन 2 घेऊन परत आलाय! या नव्या सीझनमध्ये काही जुने कलाकार परतलेत,आणि काही नव्या चेहऱ्यांनी धमाकेदार एंट्री घेतलीये! तुम्हाला माहिती आहे का? ‘सीआयडी’ च्या पहिल्या सीझनमध्ये सब-इन्स्पेक्टर विवेकचं काम करणाऱ्या अभिनेत्यानं दुसऱ्या सीझनमध्ये परत एन्ट्रीच घेतली नाही! मग आता प्रश्न पडतो आपला ‘विवेक सर’ सध्या कुठे आहेत आणि काय करतायत?
सांगायचं झालं तर, 2006 मध्ये विवेकनं ‘सीआयडी’ मध्ये एन्ट्री घेतली होती.आणि सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे त्याचं खरं नावही ‘विवेक मशरू’ च आहे!प्रेक्षकांना त्याचा जबरदस्त अंदाज,अॅक्शन आणि डायलॉग डिलिव्हरी खूपच आवडायची.सुरुवातीला फक्त ३ महिन्यांसाठी शोमध्ये आला होता पण काय अभिनय केला म्हणून काय सांगू. सगळ्यांचं मन जिंकून तब्बल ६ वर्षं शोमध्ये कायम राहिला!
२०१२ मध्ये विवेकनं ‘सीआयडी’ शो सोडला आणि त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले. शो सोडल्यानंतर त्यानं अभिनयालाही रामराम केला.सध्या विवेक बेंगळुरूमध्ये राहतो आणि कॉर्पोरेट नोकरी करत आहे. त्याच्या LinkedIn प्रोफाईलनुसार,तो Ralecon नावाच्या कंपनीत मोठ्या पदावर काम करतो. अभिनय सोडल्यानंतर त्यानं बिझनेसमध्ये आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे. विवेकनं शिकण्यासाठी ‘सीआयडी’ सोडली होती. तो सिंगापूरला गेला आणि तिथे इंटरनॅशनल बिझनेसचं शिक्षण घेतलं. शिकून आल्यानंतर त्यानं वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली आणि काही समाजसेवी संस्थांमध्येही काम केलं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
टाेमणे,भीती,आणि धाडस – विद्या बालनच्या ‘पा’ चित्रपटामागचं सत्य!