हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक परदेशी अभिनेत्री आहेत ज्यांनी बाहेरच्या देशातून येऊन आपल्या भारतीय चित्रपट क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या लोकप्रियतेमुळेच त्या हिंदी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचा घटक झाले आहेत यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते, ते म्हणजे जर्मन अभिनेत्री क्लौडिया सिसेलचे. आज(12 फेब्रुवारी) क्लौडियाचा वाढदिवस जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल.
अभिनेत्री क्लौडिया सिसेल मूळची जर्मनची आहे. लहानपणापासून तिला मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच तिने या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. क्लौडिया आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून त्या मार्फत ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. क्लौडियाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते भारतात पाहायला मिळतात त्यामुळे परदेशी असुनही तिला भारतात प्रचंड प्रेम आणि चाहता वर्ग मिळाला आहे. ती सुद्धा भारतातील अनेक भाषा शिकण्याचा नेहमी सराव करत असते. त्याच बरोबर ती आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते. मला पंजाबी, बंगाली, तामिळी अशा भाषांमध्ये चित्रपटात काम करायला आवडते असे तिने एकदा म्हटले होते.
अत्यंत प्रतिभावान अशी ही अभिनेत्री सर्वप्रथम अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 786’ चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील क्लौडियाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर तिच्या ‘क्या कूल है हम 3’ मधील चित्रपटाने बोल्डनेसच्या सगळया मर्यादा पार केल्या होत्या. तिच्या लूकवर त्या काळात सगळेच फिदा झाले होते. क्लौडिया सलमान खानच्या ‘बिग बॉस’ 3 मध्येही झळकली होती. या कार्यक्रमात तिच्या आणि प्रवेश राणाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा ही सुरू झाली होती. क्लौडिया सिसेलसुद्धा भारतीय चित्रपट क्षेत्रात चांगलीच रमली असून मला भारतीय संस्कृतीबद्दल खूप आदर आहे असे तिने म्हटले होते. आपल्या कामातून ती नेहमीच चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते.
हेही वाचा :