भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण(Irfan pathan) लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाच्या बातम्या येत असून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. अशातच इरफान पठाणच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याविषयीचीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. इरफान पठाण ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे.
क्रिकेटरचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता अभिनयातही आपलं नशीब आजमवणार आहे. ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून इरफान अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. समोर आलेल्या धमाकेदार ट्रेलरमध्ये इरफानचा जबरदस्त अभिनय पहायला मिळत आहे. सुरेश रैनाने इंस्टाग्रामवर ‘कोब्रा’चा ट्रेलर शेअर करत इरफानचं अभिनंदनही केलं आहे.
View this post on Instagram
इरफान बंदूक चालवताना दिसणार
ट्रेलरमध्ये इरफान अतिशय दमदार लूकमध्ये बंदूक चालवताना दिसत आहे. खुद्द इरफाननेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. इरफानने 2020 मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चित्रपटात काम करण्याबाबत माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.
‘कोब्रा’ या चित्रपटात इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणाऱ्या इरफानची जादू चित्रपटातही चालेल असं एकंदरित पहायला मिळत आहे. अभिनेता चियान विक्रम आणि श्रीनिधी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात विक्रम एका गणितज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त केएस रविकुमार, रोशन मॅथ्यू आणि रोबो शंकर यांसारखे कलाकार देखील चित्रपटांत दिसणार आहे.
दरम्यान, अजय ज्ञानमुथु लिखित आणि दिग्दर्शित कोब्रा या चित्रपटाला संगीत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे. ट्रेलरने चित्रपटांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. कोब्रा 31 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप; म्हणाला, ‘मी तर नामर्द आहे’
उर्फीचा बर्फी लूक! कपडे तर सोडाच, अभिनेत्रीनं शरीर झाकण्यासाठी लढवली भलतीच शक्कल
तुफान वादळात अडकली सारा अली खान, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल