Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड Coffee With Karan | जेव्हा सेलिब्रिटींच्या वक्तव्यांनी उडवली खळबळ, अभिनेत्रीच्या ‘डबल मिनींग’ उत्तराने तर सर्व झाले चकित

Coffee With Karan | जेव्हा सेलिब्रिटींच्या वक्तव्यांनी उडवली खळबळ, अभिनेत्रीच्या ‘डबल मिनींग’ उत्तराने तर सर्व झाले चकित

गॉसिपमध्ये रस असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा आवडता शो ‘कॉफी विथ करण’ खूप लोकप्रिय आहे. चित्रपट निर्माता आणि शोचा होस्ट, करण जोहरने (Karan Johar) अचानक घोषणा केली की, आता शो बंद होणार आहे आणि त्याचा सातवा सीझन येणार नाही. यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता करण जोहरने यात नवा ट्विस्ट दिला आहे. खरं तर तुम्ही हा शो टीव्हीवर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर पाहू शकता.

कॉफी विथ करणमध्ये अनेक नामांकित सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि यादरम्यान स्टार्स त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी शेअर करतात. याचमुळे काही वेळा सेलिब्रिटी वादातही सापडतात. ‘कॉफी विथ करण’मध्ये सेलिब्रिटींच्या वक्तव्यामुळे दहशत निर्माण करण्याचे अनेक प्रसंग निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही वादांबद्दल.

दीपिका पदुकोण
एकदा, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर या दोघीही कॉफी विथ करणमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘सावरिया’ चित्रपटानंतर सोनम आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर दोघांनी आपले नाते मैत्रीपर्यंत कायम ठेवले आणि दीपिका आणि रणबीर कपूर दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. करण जोहरने शोच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये रणबीर कपूरने काय एन्डोर्स करावे असे विचारले, तेव्हा दीपिकाने शोमध्ये ‘कंडोम’ म्हटले. यामुळे ऋषी कपूर चांगलेच संतापले होते.

कंगना रणौत
कंगना रणौत नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती ‘कॉफी विथ करण’च्या सीझन ५ मध्ये दिसली होती आणि यावेळी तिने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक गोष्टी बोलल्या, ज्यामुळे चित्रपट उद्योगात खळबळ उडाली होती. आजही या गोष्टींची चर्चा सुरूच आहे.

ट्विंकल खन्न
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या निराळ्या शैलीसाठी ओळखला जातो. त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील तिच्या विनोदी स्टाईलसाठी ओळखली जाते. एकदा या कपलने ‘कॉफी विथ करण’मध्येही हजेरी लावली होती. जेव्हा करण ट्विंकलला विचारतो, “अक्षयकडे असे काय आहे जे खानकडे नाही?” यावर अभिनेत्रीने “काही एक्स्ट्रा इंच” असे उत्तर दिले. तिचे हे डबल मिनींग उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

हे देखील वाचा