राइमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) ही बांग्लादेशी अभिनेत्री होती. राइमा गायब झाल्याची खबर सर्वत्र पसरली, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा शव एका पुलाच्या जवळ मिळाला. तिची डेड बॉडी एका पिशवीत बांधून फेकून देण्यात आली होती. याबाबतीत पोलिसांची चौकशी चालू आहे. चौकशीत राइमाचा पती शखावत अली नोबलने कबुल केले की, त्यानेच पत्नीची हत्या केली आहे. शिवाय असेही समोर आले की, कौटुंबिक कलहामुळे हा गुन्हा घडला. आपल्या जवळच्या व्यक्तीची अशी निर्घुणपणे हत्या केल्याची ही पहिलीच घटना नाही. तर आजपर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेक अभिनेत्रींची अशी अमानुषपणे हत्या केलेल्या घटना समोर आलेल्या आहेत.
मीनाक्षी थापर
मीनाक्षी थापरच्या निधनाच्या बातमीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तिच्या मित्रांनीच तिचे अपहरण करून, तिचे डोके धडापासून वेगळे केले होते. या घटनेवरून मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. अभिनेता अमित जैसवाल आणि त्याची गर्लफ्रेंड प्रीती सुरिनने मिळून तिची निर्घृण हत्या केली होती.
शशिरेखा
शशिरेखा ही तमिळ अभिनेत्री होती. तिची हत्या तिच्याच प्रेमाकडून झाली. खरं तर, तिचा पती रमेश शंकर याचं दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर चालू होतं. यावरूनच त्यांचे कौटुंबिक कलह चालू झाले. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण येत होता. रमेश शंकरने या वादामुळे शशीरेखाची निर्घुणपणे हत्या केली.
लैला खान
अभिनेत्री लैला खानच्या हत्येने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. तिच्या आई सेलिना पटेलची तीन लग्न झाली होती. लैलाच्या आईची मुंबईमध्ये कोट्यावधी संपत्ती होती. लैला खानच्या आईचा तिसरा नवरा परवेजने पैशांच्या मोहासाठी लैलासह तिच्या पूर्ण कुटूंबाची निर्घुणपणे हत्या केली.
प्रिया राजवंश
प्रिया राजवंशच्या आयुष्याची पूर्ण कहाणी एखाद्या सिनेमासारखी आहे. तिच्या करिअरची सुरुवात खूप दमदार झाली होती. त्यानंतर तिच्या दोन मुलांनी प्रॉपर्टीसाठी तिची निर्घुणपणे हत्या केली. तिचा अंत फार वाईट होता. दोन्ही मुलांनी तिचा गळा दाबून हत्या केली होती.
कंदील बलोच
पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रेटी कंदील बलोच हिची २०१६ मध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी कंदील बलोचच्या दोन्ही भावांनी पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचं म्हणणं होतं की, कंदील सोशल मीडियावर टाकत असलेल्या त्यामुळे, त्यांच्या घराण्याची बदनामी होत होती.
हेही वाचा :