Wednesday, July 3, 2024

आनंदाची बातमी! अखेर भारती अन् हर्षने आपल्या मुलाचा चेहरा दाखवलाच, क्यूटनेस पाहून चाहत्यांनाही आनंदाश्रू

कलाविश्वातील सर्वात कॉमेडी जोडप्यांमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या नावाचा समावेश होतो. भारती आणि हर्षने ३ एप्रिल रोजी चिमुकल्या पाहुण्याचे स्वागत केले. मात्र, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाचा चेहरा चाहत्यांपासून लपवून ठेवला होता. चाहते त्यांच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. हे जोडपे त्यांच्या मुलाचे फोटो शेअर करतात, पण त्यांचा मुलगा लक्ष याचा चेहरा चाहत्यांना दाखवत नाहीत. अशात लक्षचा चेहरा पाहण्याची चाहत्यांची विश्रांती अखेर संपली आहे. दीर्घ काळानंतर भारती आणि हर्षने त्यांच्या ब्लॉगमार्फत मुलगा लक्षचा चेहरा दाखवला आहे. यावर आता चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

भारती सिंग (Bharti Singh) हिने सर्वप्रथम तिच्या चाहत्यांना तिच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, ती लवकरच तिचा मुलगा गोला म्हणजेच लक्ष (Laksha) याचा चेहरा सर्वांना दाखवणार आहे. यानंतर भारतीने आपला मुलाची खोली लोकांना दाखवायला सुरुवात केली. आपला मुलाच्या वस्तूही तिने चाहत्यांना दाखवल्या. यानंतर हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) हादेखील आला आणि या जोडप्याने एक मोठा गिफ्ट बॉक्स उघडला. ज्यामध्ये दोघांचेही मूल होते. लक्षचा चेहरा सर्वांसमोर येताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. व्हिडिओमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया देखील त्यांच्या मुलासोबत खेळताना दिसत होते. दोघेही आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या मुलाला पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “तो त्याच्या आई-वडिलांसारखा गोंडस आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तो ज्याप्रकारे केकजवळ बसला होता, तो खूप गोंडस दिसत होता.” असेही काही चाहते होते, ज्यांच्या डोळ्यात चेंडू बघताच अश्रू आले. काही सोशल मीडिया युजर्सने अश्रूंचे इमोजी शेअर केले, तर एका चाहत्याने लिहिले की, “माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, गोलाला पाहून मी भावूक झालो, मला असे वाटले की, मी माझ्या मुलाकडे पाहत आहे.”

भारती आणि हर्षबद्दल बोलायचं झालं, तर या दोघांनी अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तसेच, ते ‘सुपरस्टार सिंगर २’ आणि ‘खतरा खतरा खतरा’ आणि ‘हम तुम और क्वारंटाइन’ यांसारख्या शोमध्ये होस्ट म्हणून सहभागी झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शॉकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भावांनी छेडछाड अन् मित्राने तर झोपेतच…’

भोले बाबा बनून चिल्लम उडवताना दिसला रितेश पांडे; म्हणाला, ‘नाचे मोर शिव जोगिया’

आलिया भट्टसोबत कसे वाटते रणबीरने सांगूनच टाकले; काय म्हणाला एकदा वाचाच

हे देखील वाचा