Friday, July 5, 2024

भारतीसोबत ‘हे’ काय घडलं? ऑडिशन द्यायला गेलेल्या कॉमेडियनला फरफटत काढले बाहेर, सोनालीही झाली शॉक

सिनेसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर लगेच कामावर पुनरागमन केले आहे. अशा अभिनेत्रींमध्ये कॉमेडियन भारत सिंग हिच्या नावाचाही आवर्जुन समावेश करावा लागेल. कारण, तिने मुलगा ‘लक्ष्य’ याला जन्म देताच काही दिवसानंतर लगेच कामावर पुनरागमन केले आहे. ती आपल्या कुटुंबासोबतच आपल्या कामालाही प्राथमिकता देत आहे. तिने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कसलीच कसर सोडली नाहीये. मात्र, एका रिऍलिटी शोच्या सेटवर जेव्हा ती परफॉर्म करण्यासाठी गेली, तेव्हा तिचा अभिनय पाहून क्रू मेंबर्सनी तिला सेटच्या बाहेर हाकलले.

खरं तर, झी टीव्हीवर ‘डान्स इंडिया डान्स- लिटिल मास्टर्स’ (Dance India Dance- Little Masters) रियॅलिटी शो पाहायला मिळत आहे. या शोचे सूत्रसंचालन जय भानुशाली (Jay Bhanushali) करत आहे. तसेच, सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), मौनी रॉय (Mouni Roy) आणि रेमो डिसूझा (Remo D’souza) हे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. हा शो शेवटच्या टप्प्यात आहे. यानंतर लगेच ‘सुपर मॉम्स’ (Super Moms) हा डान्स शो येणार आहे. यासाठी ऑडिशन सुरू आहेत. यासाठी भारती सिंग (Bharti Singh) हीदेखील स्टेजवर पोहोचली. आई बनल्यामुळे ती या शोसाठी पात्र ठरली आहे. मात्र, स्टेजवर परफॉर्म करताना पाहून परीक्षक रेमो डिसूझा तिला रिजेक्ट करतात. त्यानंतर तिचा हात पकडून तिला बाहेर काढले जाते. हे पाहून अभिनेत्री सोनाली आणि मौनीदेखील हैराण होतात.

भारती सिंगने ‘सामी-सामी’ गाण्यावर केला डान्स
चॅनेलकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये भारती काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये एन्ट्री घेते. तसेच, ती म्हणते की, “सुपर मॉम चालू होणार आहे ना? तर माझे ऑडिशन एकदा घ्या ना.” यावर रेमो डिसूझा विचारतो की, तिने शेवटच्या वेळी कुठे परफॉर्म केला होता? यावर भारती म्हणते की, “गणपतीमध्ये.” हे ऐकताच सोनाली हसू लागते. त्यानंतर रेमो संगीत लावण्यास सांगतो. यावर बॅकग्राऊंडला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘सामी- सामी’ गाणे वाजते. तसेच, भारती परफॉर्मन्स करू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE TV (@zeetv) 

भारतीला सेटवरून काढले जाते बाहेर
यावेळी भारती जीभ काढून आणि कमरेवर हात ठेवून आधी ठुमके लावते. त्यानंतर ती खाली झोपून नागीन डान्स करू लागते. हे पाहून उपस्थित परीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही हसू अनावर होते. मौनी रॉय तोंडावर हात ठेवत आपले हसू लपवण्याचा प्रयत्न करते. रेमोही चांगलाच लोटपोट होतो. त्यानंतर तो गंभीर होत भारतीला रिजेक्ट करतो आणि म्हणतो की, “पुढचा स्पर्धक.” त्यावेळी क्रू मेंबर्स येतात आणि भारतीचा हात पकडून तिथून घेऊन जाऊ लागतात. मात्र, ती जमिनीवर बसते. यानंतर ते तिला ओढत ओढत बाहेर घेऊन जातात. हे पाहून मौनी आणि सोनालीही हैराण होते.

हा शो शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक आपले डान्स कौशल्य दाखवणार आहेत. यामधूनच उर्मिला मातोंडकर पुनरागमन करतेय, तर अभिनेत्री भाग्यश्री रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा