Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन भारती सिंगने दाखवला ‘जलपरी’ अवतार, आठव्या महिन्यात वाढलीय ‘कॉमेडियन क्वीन’च्या चेहऱ्याची चमक

भारती सिंगने दाखवला ‘जलपरी’ अवतार, आठव्या महिन्यात वाढलीय ‘कॉमेडियन क्वीन’च्या चेहऱ्याची चमक

टीव्हीची कॉमेडियन क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग (Bharti Singh) ताशेरे ओढण्याच्या बाबतीत कोणालाच सोडत नाही. मग तिच्यासमोर कुठलाही अभिनेता असो वा दिग्दर्शक. प्रसिद्ध जोडपे भारती आणि हर्ष लिंबाचिया एप्रिल २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. आता भारती सिंग तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. अशातच तिने तिचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

भारती सिंगने या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाचा रफल्ड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये भारती सिंग एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नाहीये. भारती सिंगने मोकळ्या केसांसह कमी मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांची मनं भाळली आहेत.

हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत भारती सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, “येणाऱ्या बाळाची आई…” भारतीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून चाहत्यांकडून या फोटोंवर सतत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. केवळ चाहतेच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार देखील भारतीचे हे फोटोशूट पाहून घायाळ झाले आहेत.

अलिकडेच भारतीने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर केले होते. अशा स्थितीत पुन्हा नव्या फोटोंसह भारतीने सोशल मीडियाची सारी लाइमलाइट आपल्याकडे खेचली आहे. आठव्या महिन्यात देखील भारती मेहनतीने काम करताना दिसत आहे. शोच्या सेटवरही ती फुल ऍक्शन मोडमध्ये दिसते.

अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीने तिच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात यश मिळवले आहे. प्रेक्षकांना हसवून आणि लक्झरी लाईफ जगून भारती आज करोडपती झाली आहे. एवढेच नाही, तर भारती ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडमध्ये काही मिनिटांसाठी लाखो रुपये फी घेते. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. भारती आणि हर्ष दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले. भारती सिंग आता आई होणार आहे. भारतीने अलीकडेच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा