Tuesday, July 9, 2024

नक्कल करावी तर अशी! जॉनी लिव्हरच्या पोरीनं केली सोनम कपूरची जबरदस्त मिमिक्री; तुम्हालाही फुटेल हसू

बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर देखील तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. जॉनी लिव्हर ज्याप्रकारे अनेक बॉलिवूड स्टार्सचे अनुकरण करत असतात, त्याचप्रमाणे आता जेमी बॉलिवूड अभिनेत्रींची नक्कल करताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर नाही, पण छोट्या पडद्यावर जेमीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेमीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुपरस्टार अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरची नक्कल करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जेमीने तिच्या कपाळावर सिंदूर लावले आहे आणि सोनमच्या आवाजात बोलत आहे. जेमी इंग्रजीत बोलत आहे, ती अनेक शहरांची आणि देशांची नावे घेत आहे. तसेच अनेक महागड्या गाड्यांची नावे घेत आहे. जेमी हुबेहूब सोनमची कॉपी करत आहे. हे पाहून तुम्हालाही हसू फुटेल. रिद्धिमा पंडित देखील प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. तिने प्रतिक्रिया देताना स्माईल ईमोजी कमेंट केले आहेत.

व्हिडिओ शेअर करताना जेमीने लिहिले की, “सोनम इज हियर, मेक वे.” या व्हिडिओवर जेमीचे चाहत्यांकडून खूप कौतुक केले जात आहे. तसे, जेमी बर्‍याचदा कोणाची ना कोणाची नक्कल करत राहते. मात्र, यावेळी तिचा सोनम कपूर लूक प्रचंड लोकप्रिय होत आहे.

जेमी सतत कोणत्या ना कोणत्या टीव्ही शोमध्ये दिसते आणि प्रेक्षकांनाही तिचा अभिनय खूप आवडतो. जेमी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे आणि तिचे कॉमेडी व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांची मने जिंकत राहते. जेमीचा सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.

जेमीने बॉलिवूडमध्ये २०१५ मध्ये ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय ती ‘हाऊसफुल ४’मध्ये ‘गिगली’ची भूमिका साकारताना दिसली होती. चाहत्यांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटातील जेमीच्या जबरदस्त अभिनय खूप आवडला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

हे देखील वाचा