Monday, July 1, 2024

‘खिलाडी’ अक्षयमुळे उडाली कपिलची झोप; म्हणाला, ‘मी तर झोपलो नाही, प्रेक्षकांमधील काही लोक टॉयलेटसाठीही…’

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठी आणि विनोदबुद्धीसाठी ओळखले जातात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे ‘खिलाडी’ अक्षय कुमार होय. अक्षय सकाळी लवकर उठून कामावर जातो, हे सर्वांनाच माहिती आहे. मग ते कोणत्या चित्रपटाची शूटिंग असो किंवा टीव्ही शोची. त्याला सकाळी लवकर उठून शूटवर जाण्याची सवय आहे. अनेकदा त्याच्यामुळे इतर कलाकारही शूटवर लवकर जातात. कपिल शर्मालाही अक्षय आल्यानंतर आपल्या शोची शूटिंग लवकर करावी लागते.

कपिलने अनेकदा आपल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याचा उल्लेख केला आहे. अशातच आता त्याने नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की, “अक्षय पाजीसोबत माझे शूट आहे आणि मी रात्रभर झोपलेलो नाहीये. कारण आम्ही रात्रभर हे काम करत होतो. सेट तयार होत होता आणि आताही झाला नाहीये. मात्र, काय करणार ना अक्षय कुमार आहे, त्यांना काय सांगणार?” (Comedian Kapil Sharma Reveal How Show Full Team And Audience Prepare Themselves When Akshay Kumar Came For Shoot)

तसेच पुढे बोलताना कपिल शर्मा म्हणतो की, “मी तर झोपलो नाही. मात्र, प्रेक्षकांमधील काही लोक तर टॉयलेटसाठीही उठले नाहीत.” असे बोलल्यानंतर तो जोरजोरात हसू लागतो आणि त्यानंतर अक्षयची एन्ट्री होते. त्यावेळी तो कपिलच्या पाया पडताना दिसतो.

हा व्हिडिओ शेअर करत कपिलने लिहिले आहे की, “द कपिल शर्मा शोच्या नवीन सिझनची तयारी वेडेपणा आणि हास्याने भरलेली आहे. पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवर पाहा. कपिल शर्मा”

खरं तर अक्षय जेव्हा कपिल शर्मा शोच्या सेटवर गेला होता, तेव्हा कपिलने त्याच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्यामध्ये अक्षय त्याच्या पाया पडताना दिसत होता. फोटो शेअर करत कपिलने लिहिले होते की, “सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता श्री अक्षय कुमार आपल्या बेलबॉटम चित्रपटासाठी आशीर्वाद घेताना.”

या पोस्टवर कमेंट करत अक्षयने लिहिले होते की, “आणि आशीर्वादानंतर श्री अक्षय कुमार श्री कपिल शर्माचा मेंदू गुडघ्यात शोधताना.”

खरं तर अक्षय ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपल्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला आहे. अक्षयसोबत हुमा कुरेशी, वाणी कपूर आणि जॅकी भगनानीही शोमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

-रितेश अन् नीलमचं ‘मटक मटक के’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

हे देखील वाचा