सध्या कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या शोमुळे किंवा कुठल्या वादामुळे नाही तर त्याच्या आगामी Zwigato या चित्रपटामुळे गाजत आहे. सतत मीडियामध्ये तो प्रमोशनच्या निमित्ताने लाइमलाईट्मधे येत आहे. या सिनेमाचे तो जोरदार प्रमोशन करत असून, यासाठी तो विविध शो, विविध ठिकाणी जाऊन चित्रपटाला प्रमोट करत आहे. याच निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. त्यात त्याने त्याच्या काही वैयक्तिक बाबींबद्दल भाष्य केले. सोबतच त्याच्या नेटवर्थबद्दल देखील सांगितले.
एका मुलाखतीमध्ये कपिल शर्माला त्याच्या एकूण संपत्तीबद्दल आणि त्याच्या कमाईबद्दल विचारण्यात आले. त्याला विचारले गेले की खरंच त्याचे नेटवर्थ ३०० कोटी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना तो आधी हसला आणि त्याने सांगितले की, “मी खूप पैसे गमावला देखील आहे. खरं सांगायचे तर मी या सर्व गोष्टींबद्दल विचार करत नाही. मला फक्त हे माहित आहे की, माझ्याकडे घर आहे, गाडी आहे आणि कुटुंब आहे. हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. हो नक्कीच मी साधू नाही, मात्र जेव्हा पैसा येईल तेव्हा मी नकार नाही देणार. मात्र आज देखील माझे विचार पगारासारखे आहे. माझ्या पत्नीला वस्तूंवर पैसे खर्च करायला आवडते, मात्र मला नाही. पण ती श्रीमंत घरातून आली आहे, हे वेगळे आहे.”
पुढे कपिल म्हणाला, “जसे सर्वाना माहित आहे की, गिन्नी श्रीमंत घरातून आली आहे, मात्र तिने माझी पार्श्वभूमी माहित असूनही सर्व काही अड्जस्ट केले.” दरम्यान कपिल शर्मा आणि गिन्नी यांचा बॉंड खूप स्ट्रॉंग असून, ते अनेक वर्ष रेलशनशिपमध्ये होते. त्यांनतर त्यांनी १२ डिसेंबर २०१८ ला लग्न केले त्यांना एक मुलगी अनायरा आणि एक मुलगा त्रिशान आहे.
कपिलने स्टॅन्डअप कॉमेडीपासून त्याच्या करियरला सुरुवात केली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’चे तिसरे पर्व जिंकत त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये दिसला. पुढे त्याने ‘भावनाओं को समझो’ (2010), ‘किस किसको प्यार करूं’ (2015), आणि ‘फिरंगी’ (2017) या चित्रपटांमध्ये काम केले. त त्याच्या सुपरहिट अशा कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा या शोसाठी ओळखला जातो. येत्या १७ मार्चला त्याचा Zwigato हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, सिनेमाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास