‘शेरशाह’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची टीम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. नुकताच एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर प्रत्येकजण शोची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याच्या शो दरम्यान, होस्ट कपिल शर्मा कियारा आडवाणीसोबत फ्लर्ट करताना दिसेल. कपिल कियाराला म्हणतो की, “आधी तू अक्षय कुमारसोबत ‘लक्ष्मी’ चित्रपटासाठी आली होती आणि आता सिद्धार्थसोबत आली आहे. तू एकटी का येत नाहीस?”
यावर सिद्धार्थ लगेच म्हणतो, “भावाच घर तर आहे.” दुसरीकडे, कियारा म्हणते, “कपिल दोन मुलांनंतरही…” तर लगेचच कपिल म्हणाला, “मुलं तर लहान आहेत, त्यांना कुठं काय कळणार आहे.” कपिलचे हेच उत्तर चाहत्यांना चांगलेच भावले आहे.
कपिल शर्माचे हे बोलणे ऐकल्यानंतर अर्चना पूरन सिंग म्हणतात की, “गिन्नी (कपिल शर्माची पत्नी) तू ऐकत आहेस ना?” कपिल हे ऐकल्यावर म्हणतो, “तोडून टाक, आता आमचं नातंही तोडून टाक.” कपिलचे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे खूप हसतात.
दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या चित्रपटाच्या हिट गाण्यावर रोमान्स करत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा सुपर क्युट व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत आहेत की, “कृपया लग्न करा.”
कियारा आडवाणी ‘शेरशाह’मध्ये डिंपल चीमाची भूमिका साकारून बरीच चर्चेत आली आहे. तिच्या लूकपासून ते चित्रपटातील तिच्या अभिनयापर्यंत तिचे खूप कौतुक केले जात आहे. तिचे पात्र सर्वत्र पसंत केले जात आहे. केवळ कियाराच नाही, तर कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रानेही कमालीची भूमिका साकारली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…