प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेते राजीव निगम यांचा नऊ वर्षीय मुलगा देवराजचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. ८ नोव्हेंबर रोजीच राजीवचा जन्मदिवस होता आणि त्या दिवशी केक कापण्यापूर्वीच त्यांचा मुलगा हे जग सोडून गेला. या गोष्टीमुळे राजीव आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता राजीव यांनी मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना राजीव म्हणाले की, ते गेली अडीच वर्षं आर्थिक चणचणीला तोंड देत आहेत. एका बाजूला त्यांच्याकडे कुठले काम नव्हते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलावर उपचार चालू होते. या कठीण काळात मनीष पॉल सोडून बाकी कोणीही त्यांची मदत केली नाही. राजीव म्हणाले, मनीषने आर्थिक आधारासोबतच मानसिकही आधार दिला.
राजीव यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर एका फेसबुक पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले. त्यात त्यांनी लिहिले की, “माझ्या जन्मदिवसावर हे कुठलं सरप्राईझ मिळालं आहे. माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला, वाढदिवसाचा केक न कापता. वेड्या असं कोणी गिफ्ट देतं का?”
https://www.facebook.com/rajeevcomedian/posts/3590238817688934
आजारी असायचा मुलगा
राजीव निगम यांचा मुलगा देवराज हा अनेकदा आजारी असायचा. २०१८ साली त्याची तब्येत भरपूर प्रमाणात बिघडली होती. ज्यामुळे त्याला काही दिवस आयसीयूमध्येही ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी राजीव यांच्या वडिलांचेही निधन झाले होते.
राजीव निगम बर्याच विनोदी कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. त्यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’, ‘लाफ्टर चैलेंज’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ यांसारख्या कार्यक्रमांत काम करून लोकांची मनं जिंकली आहेत. याव्यतिरिक्त ते लेखकही आहेत.