Wednesday, July 3, 2024

‘मी फक्त एवढंच सांगू शकते…’, राजूच्या तब्येतीबद्दल पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचे कुटुंबीय सध्या दु:खात आहेत. राजू 10 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल आहे. त्याला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला ताबडतोब दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एवढ्या दिवसांनंतरही त्याला शुद्ध आली नाहीये. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, राजूला शुद्ध आली होती आणि त्याने पत्नीचा हातही पकडला होता. मात्र, या गोष्टीचे राजूची पत्नी शिखा श्रीवास्तव हिने खंडन केले आहे. तिने राजूच्या तब्येतीबद्दल वक्तव्य केले आहे.

आयसीयूमध्ये दाखल आहे राजू श्रीवास्तव
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) हा जवळपास 28 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. 10 ऑगस्ट रोजी जेव्हा त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्याच्यावर 11 डॉक्टरांची टीम उपचार करत होती. यानंतर समजले की, तो कोमात गेला आहे. त्याचे कुटुंबीय सध्या खूपच चिंतेत आहेत. राजूच्या तब्येतीबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे त्याच्या पत्नीने नेटकऱ्यांना झापलं आहे.

काय म्हणाली शिखा?
राजू श्रीवास्तव याची पत्नी शिखा श्रीवास्तव हिने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी फक्त एवढंच सांगू शकते की, त्याची तब्येत आता स्थिर आहे. तो अजूनही व्हेंटिलेटरवरच आहे. वैद्यकीय पथक त्यांचे काम व्यवस्थित करत आहे आणि पूर्ण प्रयत्न करत आहे. आम्हाला तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे, जेणेकरून तो लवकरात लवकर बरा होऊन आमच्याकडे येईल.”

कशी बिघडली तब्येत?
काही दिवसांपूर्वी राजूची तब्येत अचानक बिघडली होती. राजूला संसर्ग झाले होते, ज्यामुळे त्याला जास्तच ताप आला होता. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या राजूकडे जाण्यासाठी त्याच्या पत्नीशिवाय इतर कोणालाही परवानगी नव्हती. राजूचे संपूर्ण कुटुंब तो बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावरही राजूसाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’
रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?
‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी रणबीर आणि आलियाचा निषेध, महाकाल मंदिरात जाण्यापासून रोखले

हे देखील वाचा