मागील दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हा त्याच्या तब्येतीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही तो तिथेच उपचार घेत आहे. चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, अशात त्याच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. त्याची तब्येत पुन्हा बिघडल्याचे सांगितले जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याची तब्येत खूपच खालावली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेला राजू आता ८ दिवसानंतरही शुद्धीत आला नाहीये. त्याच्या बिघडलेल्या तब्येतीची बातमी समोर येताच, सर्वांची चिंता वाढली आहे. डॉक्टरांनीही त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
मेंदूत झाली होती दुखापत
राजू श्रीवास्तव याला रुग्णालयात दाखल होऊन आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अजूनही तो बेशुद्धच आहे. त्याच्या हृदयाचे ठोके सामान्यरीत्या काम करत होते, पण मेंदूतील एका भागात दुखापत झाल्याचे निशाण आहे. ही दुखापत मेंदूत ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे झाली आहे. शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) राजूचे एमआरआय करण्यात आले होते. या एमआरआयमध्ये समजले होते की, डोक्याच्या वरच्या भागातील मेंदूमध्ये काही डाग आहेत. हे डाग दुखापत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
एमआरआयमध्ये दिसलेली दुखापत ही जखमी झाल्यामुळे नाही, तर जिममध्ये बेशुद्ध झाल्यानंतर जवळपास २५ मिनिटे ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने झाली आहे. खरं तर, हृदयविकाराचा झटका पडण्यासोबतच राजूच्या पल्सही जवळपास बंद झाल्या होत्या, त्यानंतर त्याच्या मेंदूतील ऑक्सिजन पुरवठा थांबला होता. यामुळेच त्याच्या मेंदूच्या वरील भागाला दुखापत झाली आहे.
View this post on Instagram
बेशुद्ध झाल्यापासून व्हेंटिलेटरवर
विशेष म्हणजे, राजू श्रीवास्तव हा १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना अनाचक बेशुद्ध झाला होता. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर आहे. त्याचे मित्र, कलाकार आणि चाहते त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मग मी काय ऍबॉर्शन करू का?’ मुलीच्या जन्मानंतर ४ महिन्यातच प्रेग्नेंट राहिल्यावर ट्रॉलर्सला अभिनेत्रीचे उत्तर
गिप्पी ग्रेवालने सांगितली त्याची संघर्षमय कहाणी; म्हणाले, ‘पंजाबमध्ये खंडणी वसूल करणे…’
‘जगातील कोणतीही शक्ती आम्हाला…’ बॉयकॉट बॉलिवूडवर विवेक अग्निहोत्रींची खळबळजनक प्रतिक्रिया समोर