Friday, July 5, 2024

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल

देशातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav)यांची प्रकृती आता ठीक आहे. मात्र, 17 दिवसानंतरही ते वेंटिलेटरवर आहेत. कॉमेडियनला शुद्धीवर आणण्यासाठी विशेष डॉक्टरांची टीम अहोरात्र झटत आहे. कुटुंबीय आणि चाहते राजू श्रीवास्तवसाठी सतत प्रार्थना करत आहेत. पण, असे काही लोक आहेत जे स्वत:च्या फायद्यासाठी राजूच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या फेक न्यूजमुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत.

राजूच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली
राजूचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केल्याची माहिती दिली आहे. दीपू सांगतात, “माझा भाऊ राजूच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर आलेल्या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळे याविरोधात कठोर कारवाई करत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सायबर सेलने राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित खोट्या बातम्या पसरवणारी सोशल मीडियावरील 42 पेज ब्लॉक केली आहेत. यासोबतच अनेकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

वेंटिलेटर दोनदा काढण्यात आला आहे
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, राजूचे वेंटिलेटर दोनदा काढण्यात आले आहे. परंतु, डॉक्टरांनी काही वेळाने लाईफ सपोर्ट सिस्टीम पूर्ववत केली. आता डॉक्टर पुन्हा एकदा वेंटिलेटर काढण्याचा विचार करत आहेत.

राजूची प्रकृती कशी आहे
अलीकडेच राजूची मुलगी अंतरा हिने राजूची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. मुलगी म्हणाली होती की, “माझ्या वडिलांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तुम्हाला विनंती आहे की, एम्स दिल्ली आणि राजूच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवा कारण इतर कोणाचीही विधाने अविश्वसनीय आहेत. ”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कपिल शर्माचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘यामुळे तुमची मर्दानगी संपत नाही’
हा तर स्वस्तातला शाखा! डुप्लिकेट अजय देवगणचा सोशल मीडियावर धुमाकूळ
महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनालीचा नवा लूक, पाहा फोटो

हे देखील वाचा