आजपर्यंत आपण अनेक कलाकारांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले आहे. मग यामध्ये बॉलिवूड कलाकार असो, टीव्ही कलाकार असो किंवा मग रियॅलिटी शोमधील कलाकार असो. यातील बऱ्याच कलाकारांचे वजन सुरुवातीला फारच होते, परंतु त्यानंतर त्यांनी स्वत: वर मेहनत घेतली आणि पुन्हा आपल्या साधारण लूकमध्ये आले. असेच काहीसे आहे ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’मधील गंगूबाईची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली सलोनी दैनी होय. १९ जून, २००१ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जन्मलेली सलोनी २० वर्षांची झाली आहे. सलोनीला आपल्या उत्तम कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जात होते. सध्या मात्र ती आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. तिच्या बदललेल्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर अक्षरश: राडा घालताना दिसत आहेत, ज्यात ती खूपच फिट दिसत आहे. ती इतकी बदलली आहे की, तिला ओळखणे देखील कठीण होत आहे.
तरीही नेहमीप्रमाणे ती इतकी फिट कधीच नव्हती. इतकेच नव्हे, तर तिला अनेकवेळा आपल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.
सलोनीने केवळ ३ वर्षांच्या वयात टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात पाऊल ठेवले होते. तिच्यानुसार, आपल्या वजनामुळे नेहमीच तिला बॉडी शेमिंगला बळी पडावे लागायचे. अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनाची थट्टा उडवली होती. सोशल मीडियावरही नेहमीच तिला आपल्या वजनामुळे खूप काही ऐकावे लागले होते. यानंतर सलोनीने स्वत: ला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला, जे आज आपण सर्वजण पाहत आहोत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सलोनीने लॉकडाऊनदरम्यान आपले तब्बल २२ किलो वजन कमी केले आहे. वाढलेल्या वजनामुळे थट्टा उडवणाऱ्या लोकांना कंटाळून सलोनीने स्वत: ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीत सलोनीने म्हटले होते की, गंगूबाई माझे आवडते पात्र आहे.
लॉकडाऊनमध्ये केले २२ किलो वजन कमी
आपले वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सलोनीने म्हटले होते की, “जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले, तेव्हा मी घरी खूप जेवण करत होते. माझी आई घरीच मोमोज, बटर चिकन, केक आणि इतर गोष्टी बनवत होती. एकेदिवशी मी लॅपटॉपवर एक शो पाहत होते. अचनाक स्क्रीन लॉक झाली, तेव्हा मी लॅपटॉपवर आपला चेहरा पाहिला, तेव्हा मला वाटले की, मी खूपच जाड झाली आहे.”
“त्यावेळी माझे वजन तब्बल ८० किलोपर्यंत पोहोचले होते. यानंतर मी ठरवले की, मला आता फिट व्हायचे आहे. यानंतर मी वर्कआऊटसोबतच डाएट प्लॅनही फॉलो केला. आता माझे वजन ५८ किलो आहे. मी लॉकडाऊनमध्ये माझे २२ किलो वजन कमी केले आहे. मी लॉकडाऊनची आभारी आहे. कारण त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन जंक फूड खाऊ शकले नाही,” असेही आपल्या वजनाबद्दल बोलताना सलोनी म्हणाली.
लोक म्हणायचे म्हैस दिसत आहेस
सलोनीने सांगितल्यानुसार, “वाढलेल्या वजनामुळे लोक मला ‘म्हैस दिसत आहेस’, ‘किती जाडी आहे, ‘किती खाणार… एके दिवशी फुटशील’ अशा कमेंट्स करत होते. परंतु मला हे सर्व वाचून खूप मजा यायची. जे लोक अशा कमेंट करतात, ते आपला चेहरा दाखवण्यास घाबरतात आणि इतरांची थट्टा उडवतात. मला वाटते की, जीवनात चांगल्या गोष्टींसाठी काम करा आणि अशा लोकांबद्दल बिल्कुल विचार करू नका.”
आपल्या व्यावसायिक प्रवासाबद्दल बोलताना सलोनी म्हणाली की, “माझ्या हातात गंगूबाईचा टॅटूही आहे. जेव्हा मी गंगूबाईची भूमिका साकारत होते, तेव्हा माझा आत्मविश्वास सातव्या आकाशावर असतो. मी काहीही बोलू शकते आणि काहीही करू शकते. मी स्टेजवरही काहीही करू शकते.”
पुढे बोलताना ती म्हणाली की, “परंतु जेव्हा मी सलोनी असते, तेव्हा खूप शांत राहते. गंगूबाईची भूमिका मला आत्मविश्वासाने प्रफुल्लित करते. लोक जेव्हा मला गंगूबाई नावाने ओळखतात, तेव्हा मला चांगले वाटते. भविष्यातही लोकांनी मला गंगूबाई नावानेच पुकारावे अशी माझी इच्छा आहे.”
सलोनी दैनीने केवळ टीव्ही इंडस्ट्रीच नव्हे, तर हिंदी आणि मराठी चित्रपटातही काम केले आहे. यात ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटाचाही समावेश आहे. ती सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. आपले फोटोही ती शेअर करताना दिसते. यावरून दिसते की, मागील काही महिन्यात चांगलीच बदलली आहे.
शाहरुख खानच्या शोमध्येही केलंय काम
सलोनीने शाहरुख खानच्या ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं’ या शोच्या प्रोमोमध्येही काम केलंय. सन २०१५ मध्ये आलेली व्हिडिओ सीरिज ‘मैं तेरा हूं’ मध्येही सलोनी झळकली आहे. सलोनीने ‘टेढी़- मेढी़ फॅमिली’, ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘नमूने और ये जादू है’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…