‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, हे शब्द बोलत ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आठवड्यात फक्त दोन दिवसांसाठी प्रेक्षकांच्या भेटीला येऊन, त्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर बाकी सोडली नाही. शोच्या या कामगिरीमध्ये, इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री श्रेया बुगडेचाही मोलाचा वाटा आहे. सुरुवातीपासून ती एकटीच स्त्री या शोमध्ये आहे, पण सगळ्या पुरुष कलाकारांना पुरून उरेल अशी कामगिरी तिने करून दाखवली आहे. विविध कलाकारांची हुबेहुब नक्कल करून तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. श्रेया अधून-मधून सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
श्रेयाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहून असे वाटत आहे की, ती कुठेतरी फिरायला गेली आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच तिने डोळ्यांवर चष्मा लावलेला आहे. तिच्या मागे समुद्र दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर दिसत आहे. (Comedian shreya bugde share her photos on social media)
श्रेयाने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तसेच कलाकार कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने “तू खूप सुंदर दिसत आहे,” अशी कमेंट केली आहे. तसेच ऋतुजा बागवे हिने देखील कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “कमाल,” अशी कमेंट केली आहे. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
श्रेयाने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘माझी वेळ येईपर्यंत वाट बघा’, म्हणत ऋतुजा बागवेने शेअर केला ग्लॅमरस अंदाजातील फोटो
-मृण्मयी देशपांडेच्या सुंदर फोटोंवर चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण