Monday, July 8, 2024

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर झाली ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया, चाहते करतायेत दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

डॉक्टर मशहूर गुलाटी आणि गुत्थी यांसारख्या संस्मरणीय भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुनीलवर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या शस्त्रक्रियेचे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईमध्ये आहे ॲडमिट
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने सुनीलच्या (Sunil Grover) फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अभिनेता सुनील ग्रोव्हर शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रियेनंतर बरा होत आहे. तो सुखरूप असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुनीलला प्रार्थना आणि प्रेम. #sunilgrover”

चाहते व्यक्त करत आहेत चिंत
ही बातमी समोर आल्यापासून चाहत्यांना सुनीलबद्दल सतत काळजी वाटत आहे. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी काहींनी व्हायरल भयानीला नवीनतम फोटो शेअर करून आरोग्यविषयक अपडेट्स देत राहण्याची विनंती केली आहे.

कपिलसोबत झाला होता वाद
माध्यमांतील वृत्तानुसार, फ्लाइटमध्ये कपिल शर्माचे (Kapil Sharma) कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत भांडण झाले होते. हे प्रकरण एकेकाळी खूप गाजले होते. त्यामुळे या घटनेनंतर सुनील आणि कपिल एकाही शोमध्ये एकत्र दिसले नाहीत.

सुनील ग्रोवरने दिवंगत जसपाल भाटी यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली. सुनीलच्या टीव्ही करिअरची सुरुवात ‘चला लल्ला हीरो बने’ या शोपासून झाली होती. याशिवाय सुनील सब टीव्हीच्या पहिल्या मूक शो ‘गुंटूर गूं’मध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसला होता. पण सुनीलने कलर्सच्या कॉमेडी शो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मधील गुत्थी आणि ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. मशूर गुलाटीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवली. याशिवाय तो ‘हिरोपंती’, ‘बागी’, ‘जिला गाझियाबाद’ आणि ‘गजनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. यासोबतच तो ‘सनफ्लॉवर’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिजमध्येही दिसला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा