Tuesday, July 9, 2024

दूध विकण्यासाठी बाहेर पडला सुनील ग्रोवर; कौतुक करत चाहते म्हणाले, ‘साहेब…’

छोट्या पडद्यावर ‘गुत्थी’ बनून लोकांना हसवणारा सुनील ग्रोवर अनेकदा आपल्या फनी स्टाइलमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो. सुनीलने त्याच्या काॅमेडिच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. लोकप्रिय कॉमेडियन सुनील लोकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच सुनीलने त्याची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो दूध विकताना दिसत आहे. अभिनेत्याची ही शैली चाहत्यांना पसंत पडली असून साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

खरंतर सुनील ग्रोव्हर (sunil grover) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बाईकवरून दूध विकण्यासाठी जाताना दिसत आहे. फाेटाेत तो हिवाळ्यातील कपड्यांमध्ये दिसत आहे आणि दुचाकीच्या दोन्ही बाजूला दुधाचे मोठेमाेठे डबे लटकलेले आहेत. यासोबत त्याने ‘दुध मचाले’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अभिनेत्याने फोटो पोस्ट केल्यापासून लोक त्यावर भिन्नभिन्न प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील ग्रोव्हरच्या या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले कि, “अर्धा लिटर दुध पॅक करा भाऊ”, तर दुसऱ्याने लिहिले, “साहेब, कोणतेही काम छोटे नसते, तुम्ही विका, आम्ही खरेदी करू.” त्याचवेळी एका चाहत्याने द कपिल शर्मा शोच्या शैलीत लिहिले की, “डीजीडीडब्ल्यू डॉक्टर गुलाटी दूध वाले.”

सुनील ग्रोवर एक लोकप्रिय टीव्ही कॉमेडियन असून लोक त्याला ‘गुत्थी’ नावाने ओळखतात. त्याने केवळ टीव्ही मालिकेतच नाही, तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. सुनीलने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच तो अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘गुडबाय’मध्ये दिसला होता.(comedian sunil grover was seen selling milk on the streets fans praised him and said no work is small)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! जॅकी श्रॉफ यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे केली तक्रार; म्हणाले, ‘शिक्षा द्या…’
KILLER! भगव्या बिकिनीमध्ये मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज

हे देखील वाचा