दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की मनोरंजनाची खात्री हे समीकरण जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या काही महिन्यांत आलेले दाक्षिणात्य चित्रपट तर प्रचंड हिट झाले. दाक्षिणात्य चित्रपटांच्या बाबतीत हे गोष्ट प्रामुख्याने दिसते ती म्हणजे त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात एकतरी कॉमेडी पात्र असतं. विशेष म्हणजे हे पात्र गाजतंही तेवढंच. पण अनेकांना त्या कॉमेडी हिरोंची नावंच माहित नसतील. तर आज आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी दाक्षिणात्य चित्रपटामध्ये विनोदी भूमिका निभावल्या आहेत.
या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे ब्रम्हानंद यांचेच. गेल्या अनेक वर्षांत जेवढे दाक्षिणात्य चित्रपट बनले असतील, त्यातील अर्ध्या चित्रपटांमध्ये ब्रम्हानंद दिसतात. ते दाक्षिणात्य चित्रपटातील सर्वाधिक सक्रिय कलाकारांमध्येही गणले जातात. त्यांची विनोदाची शैलीही प्रेक्षकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात उतरते. विशेष गोष्ट अशी की त्यांच्या नावावर सर्वाधिक चित्रपट करणारे जवित व्यक्ती म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डही आहे.
या यादीतील दुसरे नाव म्हणजे एमएस नारायण. 1995 साली पेडारायुडू या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. त्यांनी जवळपास ७५० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. म्हणजेच केवळ २५ वर्षांच्या अंतरात त्यांनी ७५० च्या आसपास चित्रपट केले आहेत. त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीच्या जोरावर मोठी लोकप्रियताही या काळात मिळवली.
विनोदी भूमिका साकारताना पूर्ण शरिराचा उपयोग करणारे कलाकार म्हणजे वडिवेलू. वडिवेलू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. त्यांना तमिळनाडू सरकारकडून ५ वेळा विनोदी भूमिकांसाठी पुरस्कारही देण्यात आले आहेत. १९८८ सालापासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.
तमिळ चित्रपटसृष्टीत सर्वाधिक दिसणारे विनोदी कलाकार म्हणजे योगी बाबू. विशेष गोष्ट अशी की त्याचे पदार्पणही योगी या चित्रपटातूनच झाली. तसेच त्याचे वडील इंडियन आर्मीमध्ये असल्याने तो अनेक ठिकाणी फिरला आहे. त्यानी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की त्यानी २०१६ साली २० चित्रपट केले होते.
गौंडामणी हे नाव तुम्ही ऐकले असेलच. पण त्यांचे खरं नाव आहे सुब्रमण्यम करुप्पय्या आहे. सुरुवातीला गौंडर नावाचे पात्र नाटकांमध्ये साकारल्याने त्यांना गौंडामणी म्हणून ओळख मिळाली. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांची विनोदी कामांसाठी जोडी जमली ती सेंथिलबरोबर. या दोघांनी मिळून ८० आणि ९० चे दशकं गाजवली. सेंथिल हे देखील विनोदी भूमिकांसाठी दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठे नाव आहे.
रघू बाबू हे देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्ध नाव आहे. रघू बाबू यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा विशेषत: विनोदी अभिनयाचा वारसा मिळाला. त्यांचे वडिल गिरी बाबू हे देखील प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. या पिता-पुत्रांनी अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शनही केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अलीलाही मोठी लोकप्रियता आहे. त्याने केवळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्यांनी १००० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना दोन फिल्मफेअर आणि दोन नंदी पुरस्कारही मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
रद्द करण्यात आला सोनम कपूरचा ‘बेबी शॉवर’, ‘या’ कारणामुळे घेण्यात आला मोठा निर्णय
दिशा पटानीच्या ब्लॅक ब्यूटीने उडवली चाहत्यांची झोप, पाहा व्हायरल फोटो
चाळिशीत अभिनेत्रीचा हॉट अंदाज आला समोर, साडीतील ‘हे’ फोटो वेधतायत लक्ष