Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड राजूच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट! कॉमेडियनचा पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न, मित्रांनी केली खास पूजा

राजूच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची अपडेट! कॉमेडियनचा पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न, मित्रांनी केली खास पूजा

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता राजूचे हात-पाय हलत आहेत. गेल्या दिवशी त्याने पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. कॉमेडियनच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून चाहते आणि त्याचे कुटुंबीय रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. दरम्यान, राजूच्या मुख्य सल्लागारानेही कानपूरच्या पंकी मंदिरात प्रार्थना करून त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

पूजेसाठी मंगळवार (दि. 06 सप्टेंबर) हा दिवस खूप खास होता. या दिवशी कानपूरमध्ये बुढ़वा मंगलचा प्रताप पाहायला मिळाला. या खास प्रसंगी, कानपूरचे लोक पंकी मंदिरात पूजा करतात आणि नवस मागतात. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याचे मुख्य सल्लागार अजित सक्सेनाही याच कारणासत्व मंदिरात पोहोचले आणि त्यांनी मंदिरात पोहोचून हनुमानाचे दर्शन घेतले. तसेच, लवकरात लवकर राजूची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी राजूचा बालपणीचा मित्र संजय कपूरही त्यांच्यासोबत होते.

राजूच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. राजू व्हेंटिलेटरवर असेपर्यंत काहीही सांगता येणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी राजूला भेटण्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत. त्याचवेळी त्यांनी हेही सांगितले की, यावेळी त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, मोठा भाऊ हे सर्व राजूसोबत दिल्लीत आहेत.

कॉमेडियन राजूला गेल्या महिन्यात वर्कआऊट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्याला ताबडतोब एम्समध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘मुलीप्रमाणे सजवून सख्खा चुलता बालपणी करायचा बला’त्कार’, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

क्या बात है! ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ दाखवणारी आगळी वेगळी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
एकदम सेक्सी! महिला खासदाराच्या बोल्ड फोटोंनी नेटकरी झाले घायाळ

हे देखील वाचा