Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कॉमेडी किंग कपिल शर्मा पडला होता नैराश्याला बळी, ‘या’ आधारस्तंभामुळे आला तो यातून बाहेर

‘कपिल शर्मा शो’ गेली अनेक वर्षीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण ‘काॅमेडी किंग’ बनण्याचा कपिलचा हा प्रवास खूप वाटतो तितका सोपा नव्हता. पंजाबच्या अमृतसरहून आलेल्या कपिलने आपल्या विनोदाच्या कौशल्याने सर्वच चाहत्यांचे मन जिंकले आहेत. कपिलच्या आयुष्य अनेक चढ-उतार आले परंतु, कपिलने प्रयत्न सोडले नाहीत. कपिलने स्वत:च्या मनाशी पक्के केले होती की आपले स्वप्न काही झाले तरीही पुर्ण करायचे. कपिलच्या चेहर्‍यावरचे हास्य आणि त्याचे मजेशीर व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर तो मानसिक तणावाखाली जगत असेल असे कोणाला वाटणारच नाही. त्यांच्या या हास्यामागील दुःख ओळखणे खूपच कठीण होते.

माध्यमांशी बोलताना कपिलने खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “आयुष्यात एक काळ असा आला होता की, मी हळुहळू नैराश्याखाली जगायला लागलो. परंतु, या काळात मला माझ्या पत्नीने मला खूप धीर दिला. गिन्नीला कपिलने ‘आधारस्तंभ’ अशी उपमा दिली. तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, “काम करत असताना मी खूप डिप्रेशनमध्ये जात होतो. नकारात्मक गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम व्हायचा. त्यावेळी, माझ्या मनातली आशा पुर्णपणे संपली होती. परंतु, त्या प्रसंगी मला माझ्या कुटुंबाने आणि पत्नी गिन्नीने खूप धीर दिला.”

तसेच कपिलने टिव्ही इंडस्ट्रीत पुरागमन करण्याचे सर्व श्रेय त्यांच्या पत्नीला दिले. तो पुढे म्हणाला, “माझी आई गृहिणी आहे. त्यामुळे तिला मानसिक तणावाविषयी काहीच माहिती नाही. केवळ आईलाच नाही, तर मलाही याबद्द्ल काहीच माहिती नव्हती. परंतु, एका वृत्तपत्रामध्ये लिहून आले होते की, ‘कपिल शर्मा मानसिक तणावाखाली’ ते वाचून मला समजले की मी मानसिक तणावाखाली जगत होतो.”

गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत‌. त्यामुळे घरातील वातावरण बदलले आहे. परंतु, अनेकदा असे दिसून येत आहे की, रोजगार नसल्याने लोकांमध्ये नैराश्य येतं असल्याने याचा परिणाम घरातील वातावरणावर होत आहे. परंतु, या सर्वांचे मनोरंजन करुन कपिलने अनेकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा