Saturday, June 29, 2024

भारतीने घेतली गोविंदाची मजा; म्हणाली, ‘९०च्या दशकातील अभिनेत्री कोणाशीही व्हायची सेट, पण आजकालच्या…’

सर्वांना हसवण्यासाठी कपिल शर्मा पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्याच्या संपूर्ण टीमसह परतला आहे. भारती सिंग, कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंग, चंदर प्रभाकर आणि सुदेश लहरी हे कलाकार आपल्या कॉमेडीने चाहत्यांची मने जिंकत आहेत. या आठवड्यात कपिल शर्माच्या शोमध्ये खूप मस्ती पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात भारती गोविंदासोबत मजा करत आहेच, पण कपिल शर्माही तिची चेष्टा करताना दिसत आहे.

नव्वदच्या दशकातील अभिनेत्रींविषयी ही गोष्ट सांगितली
‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून आलेले गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा हा व्हिडिओ शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारती गोविंदासोबत मजा करत आहे. त्याचबरोबर म्हणत आहे की, “तुमच्या ९० च्या दशकातील नायिका खूप कमी मेंटेनन्सची होती. कुली असो किंवा रिक्षाचालक असो ती कोणाशीही सेट व्हायची, पण आजकालच्या अभिनेत्रींकडे बघितले तर नखरेच खूप आहेत.”

भारती कपिल शर्माला खडसावताना दिसली
याच दरम्यान नेहमी सर्वांची चेष्टा करणाऱ्या कपिल शर्मावर भारती सिंगने जबरदस्त विनोद केले. गोविंदासोबत मजा करताना भारतीने कपिलची खिल्ली उडवली. यावेळी भारती म्हणते की, “बघा या माणसाकडे किती पैसे आहेत, पण दीपिका रणवीरकडेच गेली ना.” भारतीचे हे बोलणं ऐकून सगळे स्टेजवर हसायला लागले. गोविंदा देखील भारतीच्या बोलण्याला सहमती देताना दिसले. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे तर भारती बरोबर बोलली अगोदरच्या अभिनेत्रींना मागणी नव्हती.”

सोशल मीडियावर होत आहे व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ २ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना फक्त कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदाचा डान्स पाहायला मिळणार नाही, तर असे अनेक प्रश्न कपिल गोविंदाला विचारतानाही दिसेल, ज्याची उत्तरे त्याला देणे कठीण आहे.

अक्षय कुमार बनला पहिला पाहुणा
कपिल शर्माच्या तिसऱ्या पर्वाचा पहिला भाग २१ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. ज्यात अक्षय कुमार हा पहिला पाहुणा म्हणून आला होता. अक्षय यापूर्वी अनेकवेळा कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणा म्हणून दिसला आहे. त्याचबरोबर अक्षय जेव्हा कपिलच्या शोमध्ये येतो, तेव्हा हास्य द्विगुणीत होते. पहिल्या एपिसोडमध्येच अक्षय आणि कपिलने खूप धमाल केली होती.

कृष्णा अभिषेक भागातून गायब
कृष्णा अभिषेकने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेल्या १५ दिवसांपासून मी माझ्या चित्रपटाची तारीख आणि ‘द कपिल शर्मा शो’च्या तारखेदरम्यान समायोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. मी कपिलसाठी माझ्या तारखा समायोजित करू शकतो, पण तो शोमध्ये पाहुणे म्हणून येत असल्याची माहिती मिळताच मला त्या एपिसोडचा भाग व्हायचे नव्हते. म्हणून मी माझी तारीख देखील समायोजित केली नाही. आम्ही एकत्र शूट करणार नाही.” यामागचे कारण असे की यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या विसंवादामुळे दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा