Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवरात्री २०२१: ‘मोहे रंग दो लाल’, म्हणत सुखदाकडून दिलखेचक फोटो शेअर, तर पती अभिजितची कमेंट ठरतेय लक्षवेधी

मराठी सिनेसृष्टीत आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर होय. तिचे फोटोशूट्स बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सदैव पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे हृदय चोरते. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. नुकतीच अभिनेत्रीने शेअर केलेली एक पोस्ट आणि सोबतच त्यावर तिचा पती अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट बरीच चर्चेत आली आहे.

आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी लाल रंगाचा मान असतो. या निमित्ताने सुखदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या अनारकली ड्रेसमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसत आहे. वास्तविक हा फोटो एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यानचा आहे.

सुखदाच्या या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत, हे फोटोवरील कमेंट्सने सहज आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे अभिजित खांडकेकरनेही तिच्या या फोटोवर लक्षवेधी कमेंट केली आहे. फोटोवर कमेंट करत अभिजितने हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे.

सुखदा आणि अभिजित हे सिनेसृष्टीतले रोमँटिक जोडपे आहे. बऱ्याचदा हे जोडपे त्यांचे कपल फोटोशूट शेअर करत असते. सुखदाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘आभास हा’, ‘घरकुल’ यासारख्या मालिकेमध्ये दिसली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मध्ये तिने मल्हाररावांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय सुखदा ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा