Saturday, June 29, 2024

प्रदर्शनाआधीच ‘थँक गॉड’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रावर गुन्हा दाखल

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ चांगलाच चर्चेत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याच्या ट्रेलरने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. त्याचबरोबर चित्रपटातील गाण्याचीही चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, थँक गॉड चित्रपटाची स्टार कास्ट, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहणार्‍या हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध जौनपूर कोर्टात केस दाखल केली आहे. चित्रपटाच्या कलाकार आणि दिग्दर्शकावर धर्माची खिल्ली उडवल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

हिमांशूने आपल्या तक्रारीत पुढे लिहिले आहे की, चित्रगुप्त प्रत्येक माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतो आणि त्याला कर्माचा देव मानला जातो. अशा परिस्थितीत देवांचे असे चित्रण योग्य नाही आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ट्रेलरमध्ये चित्रगुप्त आधुनिक कपड्यांमध्ये सूट-बूट घातलेला दिसत आहे. यासोबत अजय देवगण चित्रगुप्तासारखी भाषा वापरतोय आणि विनोद करतोय.

दरम्यान, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेला ‘थँक गॉड’ हा चित्रपट पुढील महिन्यात २४ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याचवेळी, 18 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच न्यायालयात तक्रारदाराचे जबाब नोंदवले जातील. चित्रपटात मणिके मगे हिथे हे गाणेही दिसणार आहे. ज्याची पहिली झलक पाहून चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा – जॅकी श्रॉफमुळे अनिल कपूर यांना वाटायचे असुरक्षित, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
पनवेलच्या फार्महाऊसची रेकी करून बिश्नोई गँगने केलेला बंदोबस्त; सलमानच्या हत्येसाठी काय होता ‘प्लॅन बी’
सुंदरता अशी की, पाहताक्षणीच पडाल प्रेमात! पाहा सोनालीची फोटो गॅलेरी

हे देखील वाचा