लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने गुरुवार, १५ ऑगस्ट रोजी शिर्डी साई बाबांचं दर्शन घेतलं. यादरम्यान, तिने माध्यमांशी संवाद साधला. या संवादात तिने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, या चित्रपटात झांसी की राणीची भूमिका साकारणे हा तिच्यासाठी पुनर्जन्मासारखा अनुभव होता.
‘झांसी की राणीची भूमिका साकारल्यानंतर, माझा पुनर्जन्म झाला. मला स्वातंत्र्यलढा आणि देशाबद्दल माहिती मिळाली. चित्रपट उद्योगाने माझी प्रतिमा कलंकित केल्यानंतर, ही भूमिका माझ्यासाठी पुनर्जन्मासारखी होती. आपल्या देशातील अशा शूर महिलांवर अधिक चित्रपट बनवले पाहिजेत’.
कंगना पुढे म्हणाली की या चित्रपटाद्वारे तिला देश आणि स्वातंत्र्य चांगल्या प्रकारे समजून घेता आले. अभिनेत्री म्हणाली की, शाळांमध्ये झांसी की राणीवर लहान मुलांना सादरीकरण करताना आणि तिची भूमिका साकारताना पाहून खूप आनंद होतो. याशिवाय, तिने लोकांना आवाहन केले की जेव्हाही ते दिल्लीला येतील तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना पंतप्रधान संग्रहालयात होणारा लाईट अँड साउंड शो नक्कीच दाखवावा. मुलांसोबत तो नक्की पहा. कंगना म्हणाली, ‘या शोमध्ये वेगवेगळ्या धाडसी महिलांच्या कथा दाखवल्या जातात, ज्यात मी आवाज दिला आहे’.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
स्वातंत्र्यदिनी शाहरुख खानने शेयर केला खास फोटो; मुलासोबत फडकावला तिरंगा…










