Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड Controversy | जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर केली होती मानहानीची तक्रार, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Controversy | जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर केली होती मानहानीची तक्रार, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि वादाच खूप जवळचं नातं आहे. दरदिवशी तिच्याबद्दल काहीतरी नवीन गोष्ट समोर येत राहते. कंगना रणौतच्या विरोधात ४ जानेवारी रोजी मुंबई न्यायालयात अजामीनपात्र याचिका दाखल करण्यात आली होती, जी नंतर फेटाळण्यात आली होती. खरं तर, २०३२ मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

मात्र कंगनाला कोर्टात हजर राहायचे नव्हते. न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत छळ होत असल्याचा आरोपही तिने केला होता. कंगनाने आपल्या पहिल्या याचिकेत जावेद अख्तर यांची तक्रार अन्य न्यायालयात हस्तांतरित करावी, अशी विनंती मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली होती. त्यातच आता आणखी एक बातमी समोर येत आहे. (controversy dindoshi sessions court reserves order on kangana ranaut)

९ मार्चला मिळतील न्यायालयाकडून आदेश
कंगना रणौतने गीतकार जावेद अख्तर यांच्यामार्फत दाखल केलेल्या मानहानीचा खटला हस्तांतरित करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम ४०८ अंतर्गत दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. वृत्तानुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी याचिकेवर सुनावणी केली आणि न्यायालयाने त्यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. माध्यमातील वृत्तानुसार, न्यायालय ९ मार्च रोजी यावर आदेश देणार आहे.

जावेद अख्तर यांनी दाखल केली होती मानहानीची तक्रार
जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगना रणौतच्या विरोधात एका टेलिव्हिजन मुलाखतीत अपमानास्पद आणि निराधार टिप्पणी केल्याबद्दल मानहानीची तक्रार दाखल केली होती. अभिनेत्रीने खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत उलट तक्रार दाखल केली होती. आता न्यायालय ९ मार्च रोजी याबाबत आदेश देणार आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा