१५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरू होण्यास तयार असले तरी, पुढच्या काही महिन्यांत ओटीटीवर प्रदर्शनासाठी काही बडे चित्रपट सज्ज झालेत. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने पाच भारतीय भाषांमधील नऊ चित्रपटांची घोषणा केली जे थेट त्यांच्या प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होतील ज्यामध्ये कुली नंबर १, दुर्गावती आणि छलांग यासारखे तगडे स्टारकास्ट असलेले सिनेमे आहेत.
यामध्ये वरुण धवन आणि सारा अली खानचा “कुली नंबर १”, राजकुमार राव अभिनीत “छलांग” आणि भूमी पेडणेकरचा “दुर्गावती” हे सिनेमे आहेत. ऍमेझॉनचा प्रादेशिक सिनेमाचा आवाका विस्तृत करत अरविंद अय्यर अभिनीत “भीमा सेना नाला महाराजा” (कन्नड), आनंद देवरकोंडा अभिनीत “मिडल क्लास मेलडीझ” (तेलगू), आर. माधवन अभिनीत “मारा” (तमिळ), “वर्षा बोलम्मा आणि चेतन गंधर्व अभिनीत मन्ने नंबर १३ ”(कन्नड), जकारिया मोहम्मेची “हलाल लव्ह स्टोरी” (मल्याळम) आणि सूर्या-अभिनीत “सूरराई पोत्रू” (तमिळ) यांना येत्या काही महिन्यांत डिजिटल प्रदर्शनासाठी आधीच नक्की केले गेले होते.
या सर्व चित्रपटांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे कुली नंबर १. सारा अली खान आणि वरुण धवनचा कुली नंबर १ (२५ डिसेंबर २०२०) ख्रिसमसला रिलीज होईल, तर भूमी पेडणेकरचा “दुर्गावती” ११ डिसेंबर रोजी रिलीझ होईल. राजकुमार राव आणि नुश्रत भरुचा अभिनित “छलांग” १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.
हिंदी सिनेमांसोबतच प्रादेशिक भाषांमधील सिनेमांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत त्यात “हलाल लव्ह स्टोरी” चा प्रीमियर १५ ऑक्टोबरला होणार आहे तर “भीमा सेना नलमहाराजा” २९ ऑक्टोबरला तर “सूरराय पोत्रू” ३० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मन्ने नंबर १३ चा प्रीमियर १९ नोव्हेंबर ला होणार आहे तर २० नोव्हेंबर रोजी “मिडल क्लास मेलडीझ” रिलीझ होईल. “मारा” चा प्रीमियर १७ डिसेंबर रोजी होणार आहे.