Monday, July 1, 2024

वरुण, साराच्या कुली नं १ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित! प्रेक्षकांचे भन्नाट मिम्स वायरल

वरुण धवन आणि सारा अली खान अभिनित कुली नंबर १ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ह्या ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुली नंबर १ चा ट्रेलर बघून सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया आणि मिम्स येत आहेत.

‘कुली नंबर १’ आणि ‘गोविंदा’ असे दोन हॅशटॅग ट्विटरवर सध्या जोरदार गाजत असून, या हॅशटॅगचा वापर करून लोकांनी अनेक मिम्स सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला “ओरिगनल चित्रपटाचे ओव्हरअक्टिंग व्हर्जन” असा करार दिला आहे. तर काही लोकांनी “हा सिनेमा ओ.टी.टी.वर प्रदर्शित करण्याच्या चित्रपटाच्या टीमच्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयामुळे निर्मात्यांना थोडेफार तरी पैसे मिळतील” असे सांगितले आहे.

 

दुसरीकडे काही प्रेक्षक म्हणतात की, “ह्या सिनेमाच्या ट्रेलरसाठी खूपच जास्त उत्साहित होतो मात्र आता ट्रेलर पाहून असे वाटते की गोविंदा हा गोविंदाचा आहे”.  काही प्रेक्षक असे लिहतात की, “स्टारकिड्सला या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी फक्त एकच आधार उरला आहे, जुन्या जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांच्या चित्रपटांचे रिमेक करायचे.” एका युझरने लिहले की, ” ह्या ट्रेलर ला किती डिसलाईक्स येताय हे मी मोजत आहे.”

कुली नंबर १ हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला ओ.टी.टी.वर प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनीच केले आहे. १९९५ मध्ये गोविंदा आणि करिष्मा कपूर अभिनित कुली नंबर १ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. १९९५ वर्षातला अतिशय गाजलेला आणि लोकप्रिय ठरलेल्या या सिनेमाचा हा नवा कुली नंबर १ चित्रपट रिमेक आहे. या रिमेकमुळे वरुण धवनची तुलना गोविंदांशी होत आहे.

या सिनेमात वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव यासह अन्य कलाकार भूमिका साकारताना दिसणार असून, या सिनेमाची निर्मिती वाशु भगनानी, जैकी भगनानी और दीपशिखा देशमुख यांनी केली आहे.

हे देखील वाचा