Monday, July 1, 2024

महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट पाहाता मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे ‘या’ दोन ठिकाणी

कोरोनामुळे जगाचे सारेच गणित बिघडून गेले आहे. मागील काही दिवसात कोरोना कमी होताना दिसत होता परंतु, पुन्हा एकदा नव्याने कोरोनाने हात पसरायला सुरवात केली आहे .यावेळची परिस्थिती महाराष्ट्रात फ़ारच  गंभीर होताना दिसत आहे. ऑक्सिजन अभावी लोकांचा मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत. सगळ्या इस्पितळात बेड भरले असून, रुग्णांचा पुढे काय करायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे, त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचा विचार केला तर अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबले आहेत. त्यामुळे आता मालिकांमध्ये पुढे काय बघायचा असा मोठा प्रश्न लोकांना पडला आहे. लोकांच्या मनोरंजनाचा विचार करून काही मालिकांनी आपल्या मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करायला सुरवात केली आहे .

झी मराठीवरील अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु झाले आहे. नुकतेच मालिकेचे चित्रीकरण सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे .यात सगळेच सुरक्षतेची सगळी काळजी घेताना दिसत आहे. अग्गबाई सुनबाई, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांनी आपले काम थांबवलेले नाही. सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन  मालिकेतील सर्व  कलाकार आपल्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यावेळी झी मराठीने चाहत्यांना असाच पाठिंबा आणि आशीर्वाद असूद्यात असे म्हटले आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील सगळ्यांचे आवडते ओम आणि स्वीटू यांना, फार कमी वेळातच घराघरातून प्रेम मिळत आहे. म्हणूनच या मालिकेचे चित्रीकरण न थांबवता यांचा पुढील मुक्काम हा चित्रीकरणासाठी दमणमध्ये आला आहे. नुकतेच या मालिकेतील सर्व कलाकार दमणमध्ये हजार झाले आहेत आणि, पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करायला सज्ज आहेत.

अग्गं बाई सुनबाई ही मालिकाही एका नव्या रूपात सुरु झाली आहे. या मालिकेचे पुढील चित्रीकरण गोव्यात होणार आहे. अग्गंबाई सासूबाईचे दुसरे नवीन पर्व अग्गं बाई सुनबाई सुद्धा फार गाजत आहे. यातील बबड्या या भूमिकेमुळे ही मालिका आजवर खूप गाजली आहे.

थोडक्यात काय तर, सारे जग कोरोनामुळे थांबलेले दिसून येत आहेत  परंतु, लोकांच्या मनोरंजनासाठी कलाकार मागे हटलेले दिसत नाहीत. सुरक्षतेची सर्व काळजी घेऊन परत एकदा कलाकार चाहत्यांचे मनोरंजन करायला येत आहेत.

हे देखील वाचा